नंदुरबार - धुळे व नंदुरबार जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र दोन्ही जिल्ह्यातील निरनिराळया मतदार संघातील आमदार आणि लोकप्रतिनिधींनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास १० ते २५ लाखांपर्यत विकास कामांसाठी निधी देण्याचे जाहिर केले आहे. यातच नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पद बिनविरोध करण्यासाठी ४२ लाखांची बोली लागली आहे.
खोडांमळी गावातील भवानी माता मंदिर उभारणीसाठी जो सर्वात जास्त देणगी देईल. त्याची सरपंचपदी निवड करण्यात येईल, असे गावकऱ्यांनी ठरविले होते. त्यानुसार २५ लाखांपासून ते ३८ लाखांपर्यत बोली लावण्यात आली. मात्र गावातील प्रदिप वना पाटील यांनी चक्क ४२ लाखांची बोली लावून सर्वांची बोलती बंद केली आहे. ही राज्यातील पहिलीच घटना आहे. यामुळे नंदुरबार जिल्हयात राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. मात्र यास काही ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे.
सरपंच पदासाठी लागली ४२ लाखांची बोली-
नंदुरबार तालुक्यातील खोडांमळी गावातील प्रदिप पाटील यांनी सरपंच पदासाठी मंदिराला देणगी देण्यासाठी सर्वप्रथम निश्चिय केला होता. आपल्या घरातील एक सदस्य सरपंच पदी असावा. त्यानुसार खोडांमळी देवीवर श्रध्दा ठेवत प्रदिप पाटील यांनी देणगीसाठी बोली सुरु झाल्यावर ४२ लाख रुपयांची बोली लावून पाच वर्षासाठी खोडांमळी गावातील ग्रामापंचायतीचा सरपंच होण्याचा मान मिळविला आहे. मात्र पाटील यांना चार अपत्य असल्याने मुलीच्या गळयात सरपंच पदाची माळ पडणार आहे. गावात एकमतांने विकास कामांना चालना मिळावी, सलोखा निर्माण व्हावा हा सर्वप्रथम उद्देश असल्याचे प्रदिप पाटील यांनी माहिती देतांना सांगितले.
भाजपा आमदारांकडून बिनविरोध ग्रामपंचायतींना दहा लाखांचा निधी-
नंदुरबार जिल्ह्यात भाजपाचे शहादा-तळोदा येथील आमदार राजेश पाडवी यांनी १० लाखांचा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र गामपंचायतीचे अर्ज दाखल करण्याची मुदत ३० डिसेंबरपर्यत आहे. तर १५ जानेवारीला मतदान होणार आहे. धुळे जिल्हयात २१८ आणि नंदुरबार जिल्हयात ६७ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम सुरु आहे. यामुळे ३० डिसेंबरनंतरच आता अजून किती ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध होणार हे स्पष्ट होणार आहे.
ग्रामस्थांचा विरोध-