महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवापूर तालुक्यातील बारी गावात सागाचे 40 हजारांचे लाकूड जप्त - seized

वनविभागाद्वारे बारी या गावातील कारवाईत अवैध झाडांपासून फर्निचर बनवण्यासाठी तयार केलेल्या सागाच्या ३७ नग पाट्या एक सोपासेट, पलंग वस्तू जप्त करून कारवाई करण्यात आली आहे.

नवापूर तालुक्यातील बारी गावात सागाचे 40 हजारांचे लाकूड जप्त

By

Published : Apr 25, 2019, 3:11 PM IST

नंदुरबार -जिल्ह्यात सागवान लाकडाची तस्करी करून त्याचा सोपा, टेबल, खुर्ची, पलंग इत्यादी वस्तू बनवून त्या विकण्याचा व्यवसाय जोरात चालू आहे. जिल्ह्यातील सातपुड्याचा डोंगर आणि गुजरात राज्याच्या हद्दीतील डांग परिसरात चारी बाजूने लाकडाची कत्तल करून डोंगर उघडे पाडले आहेत, पर्यावरणावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे, परंतु येथील जनतेपुढे रोजगाराचा मोठा प्रश्न आहे.

नवापूर तालुक्यातील बारी गावात सागाचे 40 हजारांचे लाकूड जप्त

त्यामुळे लोक आपला व्यवसाय म्हणून लाकडाची तस्करी करून त्याच्या विविध वस्तू बनवून, त्या विकून रोजगार मिळवतात. जंगल संपवण्याच्या मागे स्थानिक नेते आणि वन विभागाचा मोठा वाटा आहे. बारी गावातील कारवाई तर केवळ निवडणुकीचा काळ असल्यामुळे कारवाईचा देखावा आहे. वनविभागाद्वारे बारी या गावातील कारवाईत अवैध झाडांपासून फर्निचर बनवण्यासाठी तयार केलेल्या सागाच्या ३७ नग पाट्या एक सोपासेट, पलंग वस्तू जप्त करून कारवाई करण्यात आली आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details