नंदुरबार-जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 34 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 121 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा 7 हजार 672 वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे एकूण 163 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 519 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असल्याची माहिती कोबी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. राजेश वसावे यांनी दिली आहे.
एकाच दिवशी 121 जणांची कोरोनावर मात
जिल्ह्यातून दररोज येणाऱ्या कोरोना अहवालानुसार एकाच दिवशी 121 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. त्यात नंदुरबार तालुक्यातील 39, शहादा तालुक्यातील 43, अक्कलकुवा तालुक्यातील 4, नवापूर तालुक्यातील 20, तळोदा तालुक्यातील 12, धडगांव तालुक्यातील 3 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 6 हजार 987 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
गेल्या 24 तासांमध्ये 34 जणांना कोरोनाची लागण
जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 34 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यात नंदुरबार शहरातील के.बी.नगर कोकणीहिलमध्ये 1 व्यक्ती, विद्याविहार कॉलनीत 2, रायसिंगपुरात 1, जिल्हा शासकीय रूग्णालयात 1, साक्रीनाका भागात 1, व्यंकटेश नगरात 1, विद्यानगरात 1, रामकृष्ण नगरात 1, नंदुरबार तालुक्यातील पाचोराबारी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ 1, नगांव येथे 1, शहादा शहरातील विद्याविहार कॉलनीत 1, वीरधवल नगरात 1, शहादा तालुक्यातील उंटावद येथे 2, नवापूर शहरातील शिवराम पाटील नगरात 3, गुजर गल्लीत 2, महादेव गल्लीत 1, नवापूर तालुक्यातील बालीपाड्यात 1, आमलाण येथे 2, तळोदा शहरातील विद्या नगरीत 4, तळोदा तालुक्यातील तळवे येथे 1, अक्कलकुवा आरएच येथे 1, इंदिरा नगरात 1, अक्कलकुव्यात 1, धडगांव तालुक्यातील रोषमाळ येथे 1, साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे 1 व्यक्ती असे दिवसभरात 34 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे.
जिल्ह्यात दोघांचा मृत्यू