महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुजरातमधून मध्य प्रदेशला जाणारे 34 जण ताब्यात; 110 किलोमीटर रेल्वे रुळावरून पायपीट - nandurbar labour news

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने लॉकडाऊन घोषित केले. यामुळे घरी परतणाऱया मजुरांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. अनेक ठिकाणी मजूर ट्रक, टँकरच्याने गावी पोहोचण्याचा प्रयत्न करू लागले.

nandurbar news
गुजरात राज्यातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या 34 मजूरांना नवापूर पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी ताब्यात घेतले आहे.

By

Published : Apr 6, 2020, 7:07 PM IST

नंदुरबार -कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने लॉकडाऊन घोषित केले. यामुळे घरी परतणाऱया मजुरांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. अनेक ठिकाणी मजूर ट्रक, टँकरच्याने गावी पोहोचण्याचा प्रयत्न करू लागले. काहीजण चालत घरी निघाले. यानंतर गुजरात राज्यातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या 34 मजूरांना नवापूर पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी ताब्यात घेतले आहे. हे मजूर रेल्वे रूळावरून चालत प्रवास करत होते. यानंतर पोलिसांनी त्यांना अन्न दिले. आता त्यांना नवापूरातील सीमा तपासणी नाक्यावर उभारण्यात आलेल्या शेल्टर होममध्ये ठेवण्यात आले आहे.

मध्यप्रदेशातील मजूर गुजरातमध्ये मोलमजुरी करण्यासाठी गेले होते. परंतु संपूर्ण देशात लाॅकडाऊन असल्याने ते अडकून पडले. अखेर त्यांंनी लोहमार्गावरूनच चालत गावी जाण्यास सुरुवात केली. यानंतर नवापूर हद्दीत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधितांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून लाॅकडाऊन संपल्यानंतर 34 मजुरांना त्यांच्या घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details