महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एका रुपयात लग्न; शहाद्यात 26 जोडप्यांचा सामूदायिक विवाह

डोंगरगाव रस्त्यावरील गणपती मंदिरापासून सजवलेल्या तीन ट्रॅक्टर ट्रॉलीमधून नवरदेवांची मिरवणूक काढण्यात आली. हजारो समाज बांधव, महिला, तरुण मिरवणुकीत सहभागी झाले होते.

शहाद्यात 26 जोडप्यांचा सामुदायिक विवाह
शहाद्यात 26 जोडप्यांचा सामुदायिक विवाह

By

Published : Feb 5, 2020, 5:36 PM IST

नंदुरबार- शहादा येथील तालुका खरेदी-विक्री संघाच्या आवारात संतसेना नाभिक सेवा मंडळ शहादा यांच्यातर्फे नाभिक समाजाचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. यात एकूण 26 जोडपे विवाहबद्ध झाले. या विवाह सोहळ्यामुळे खरेदी-विक्री संघाच्या आवारात अक्षरश: यात्रेचे स्वरूप आले होते. या विवाह सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ एक रुपयात विवाह करण्यात आला.

शहाद्यात 26 जोडप्यांचा सामुदायिक विवाह


डोंगरगाव रस्त्यावरील गणपती मंदिरापासून सजवलेल्या तीन ट्रॅक्टर ट्रॉलीमधून नवरदेवांची मिरवणूक काढण्यात आली. हजारो समाज बांधव, महिला, तरुण मिरवणुकीत सहभागी झाले होते. विवाह सोहळा विधीवत पद्धतीने पार पाडण्यात आला. गेल्या सहा महिन्यांपासून या सामूहिक विवाह सोहळ्याची तयारी सुरू होती. संतसेना नाभिक सेवा मंडळ शाही नोंदणीकृत मंडळ असून या मंडळामार्फत हा पहिला सामूहिक विवाह सोहळा होता. तर शहादा-नंदुरबार संयुक्तरित्या हा सातवा विवाह सोहळा होता.हेही वाचा -..तर राज्यात मध्यावधी निवडणुका होतील; चंद्रकांत पाटील यांचे भाकीत

हेही वाचा -'काँग्रेस शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर करत आहे'

विवाह सोहळा पाहण्यासाठी मंडपात दोन मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. प्रमुख मान्यवरांसाठी वेगळे स्वतंत्र व्यासपीठ तयार करण्यात आलेली होती. डॉ. कांतिलाल टाटिया, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी नवविवाहित वधू-वरांना शुभेच्छा देऊन नाभिक समाजाने जो आगळा वेगळा उपक्रम राबवला, त्याचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे आवाहन केले. या सामूहिक विवाह सोहळ्याचे सूत्रसंचालन प्राध्यापक अनिल साळुंके यांनी केले. संतसेना नाभिक सेवा मंडळ शहादाच्या सर्व पदाधिकारी समाज बांधवांनी सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

हेही वाचा -मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, अंतिम सुनावणी १७ मार्चपासून..

मंडपाच्या बाहेर रुग्णवाहिकेची देखील सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. पुरुषांना पांढरा पोशाख तर महिलांना सारख्याच रंगाच्या साड्या होत्या. विवाह सोहळ्यानंतर समाजातील दिव्यांग विद्यार्थ्यांना समाज मंडळामार्फत टी-शर्टचे वाटप करण्यात आले. आदल्या दिवशी रात्री हळदी नंतर रास-गरबासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक तसेच गुजरात, मध्यप्रदेश भागातील अडीच ते तीन हजार समाजबांधव उपस्थित होते.

सामूहिक विवाह सोहळ्याला आमदार राजेश पाडवी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, उपविभागीय अधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, उपनगराध्यक्ष रेखा चौधरी, तळोदा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्ष योगेश चौधरी, भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, शहादा नगरपालिकेचे गटनेते मकरंद पाटील, जिल्हा परिषद सभापती अभिजित पाटील, धुळे जिल्हा परिषद सदस्य शालिनी भदाने, माजी जि.प. सदस्य मालपूर येथील महावीर रावल डॉ. कांतिलाल टाटिया, माजी जिल्हा शिवसेना प्रमुख अरुण चौधरी, यशवंत चौधरी, तेली समाजाचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर चौधरी, माजी नगरसेवक डॉ. योगेश चौधरी, सातपुडा शिक्षण संस्थेचे प्राध्यापक संजय जाधव, वर्षा जाधव, नगरसेवक प्रशांत निकम, आनंदा पाटील, संजय साठे, नगरसेविका वर्षा जोहरी, योगिता वाल्हे, दिनेश खंडेलवाल, मराठा महासंघाचे शाम जाधव, रवींद्र जमादार, संतोष वाल्हे यांच्यासह विविध संस्थांचे संघटनांचे पदाधिकारी राजकीय सामाजिक कार्यकर्ते नाभिक समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details