नंदुरबार - धडगांव येथून मजूर घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटून 24 मजूर जखमी झाल्याची घटना धडगांव तालुक्यातील धवल घाटात घडली. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य विजयसिंग पराडके व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करुन जखमींना म्हसावद ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींपैकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
धडगाव तालुक्यातील वलवाल मोखाचापाडा येथील मजूर ऊस तोडीच्या कामासाठी शहादा येथे ट्रॅक्टर ट्रॉलीने जात होते. धडगांव ते शहादा रस्त्यादरम्यान असलेल्या धवल घाटातील वळणावर ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. या अपघातात 3 महिला व 1 पुरूष असे 4 मजूर गंभीर तर 20 मजूर किरकोळ जखमी झाले आहेत.
ग्रामस्थांकडून मदतकार्य
घटनेची माहिती मिळताच परिसरातील जि.प.सदस्य विजयसिंग पराडके, छोटु वळवी, रेहमल पावरा, फेरांग्या पावरा व परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यांनी मिळेल त्या वाहनाने जखमींना म्हसावद ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या जखमींवर म्हसावद येथे उपचार सुरु आहेत. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.
अपघातातील जखमींची नावे
- सुलखी सायसिंग वळवी
- रायका सायल्या वळवी
- राकेश कांतिलाल पाटील
- चंदन शामला वळवी
- बायसी तानाजी वळवी
- सेनु विक्रम वसावे
- रणजित तानाजी वळवी
- हिना तानाजी वळवी
- विपूल रेट्या पराडके
- चिंध्या आकाश वसावे
- पियु विक्रम वसावे
- मिथुन विक्रम वसावे
- संजय सामन्या वळवी
- हर्षल वसावे
- शिवली वळवी
- सचिन कनुड्या वळवी
- कोमजी रेखा पराडके
- कंड्या राखल्या वळवी
- महेंद्र रायसिंग वळवी
- तुषार सायसिंग वळवी
- राहुल सायसिंग वळवी