नंदुरबार - नंदुरबार जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ होत आहे. मंगळवारी (दि. 21 जुलै) प्राप्त झालेल्या अहवालानुसार दोन नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे एकुण बाधितांचा आकडा 414 वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे दहा जण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्ह्या अलर्ट जाहीर करण्यात आले असून जिल्ह्यातील हॉटस्पॉट ठरलेल्या भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात बाधितांचा आकडा 414 वर - नंदुरबार कोरोना अपडेट
नंदुरबार जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 414 वर पोहोचली असून त्यापैकी 243 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर 20 जणांचा यात मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या 138 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. पण, नागरिकांकडून योग्य प्रतिसाद प्रशासनाला दिले जात नाही.
मंगळवारी प्राप्त अहवालानुसार नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील 49 वर्षीय महिला आणि नंदुरबार येथील नेहरु नगरातील 64 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात बाधितांची आकडेवारी 414 झाली आहे. तर मंगळवारी एकाच दिवशी 10 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यात नंदुरबार येथील रघुवंशी नगरातील एक व्यक्ती, कुंभार गल्लीतील एक व्यक्ती, मोठा मारुती मंदिर परिसरातील एक व्यक्ती, सरस्वती नगरातील एक व्यक्ती, पायल नगरातील एक व्यक्ती, बाहेरपुरातील एक व्यक्ती, चौधरी गल्लीतील एक व्यक्ती, जिल्हा पोलीस वसाहतमधील एक व्यक्ती आणि शहादा शहरातील शंकर विहारातील एक व्यक्ती व गरीब नवाज कॉलनीतील एक व्यक्ती, असे 10 जण संसर्गमुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बाधितांचा आकडा 414 झाला असला तरी त्यापैकी 243 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या 138 सक्रिय (अॅक्टीव्ह) रूग्णांवर उपचार सुरू आहेत.