महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 6, 2021, 9:00 PM IST

ETV Bharat / state

Nandurbar Accident : गाडीचा ब्रेक फेल होऊन अपघातात 17 प्रवाशी जखमी

धडगाव तालुक्यातील खर्डा ते खटवळा रस्त्यावरील तीव्र उतारावर प्रवाशी गाडीचा ब्रेक फेल झाल्याने (Nandurbar Accident) अपघात झाला. यात चार प्रवाशी गंभीर तर 13 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.

Nandurbar Accident
Nandurbar Accident

नंदुरबार - धडगाव तालुक्यातील राजबर्डीहून धडगाव येथे आठवडे बाजारात धान्य विक्री व बाजारासाठी जात असलेल्या प्रवाशी गाडीचा ब्रेक फेल झाल्याने अपघात (Nandurbad Accident) झाला आहे. यात चार प्रवाशी गंभीर तर 13 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना राजवर्डी व धडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

नंदुरबार बातमी

ब्रेक फेल झाल्याने अपघात
धडगाव तालुक्यातील खर्डा ते खटवळा रस्त्यावरील तीव्र उतारावर प्रवाशी गाडीचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला. यात चार प्रवाशांना हातपायाला गंभीर दुखापत झाली आहे. 13 जखमी झाले आहे. जखमींना धडगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गंभीर रुग्णांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गाडीत एकूण 25 प्रवाशी असल्याचे बोलले जात आहे. धान्य व प्रवाशी भरून गाडी धडगाव येथे जाताना अपघात झाला. नंदुरबार जिल्ह्यातील अवैध वाहतूकीने प्रवाशांचा अपघात होत आहे. संबंधित विभागाने अवैध वाहतुकीवर लक्ष केंद्रित करावे.

प्रवाशांच्या वाहनाला अपघात
धडगाव येथे सोमवारी आठवडे बाजार असल्याने परिसरातील ग्रामस्थ बाजारासाठी मोठ्या संख्येने दाखल होत असतात. रस्ते रुंदीकरणाची असल्यामुळे या रस्त्यांवर फक्त जीभ किंवा कमांडर गाड्या चालतात. या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून प्रवासी वाहतूक केली जाते. अपघात झालेल्या कमांडर गाडीत आतमध्ये व वरती टपावर जवळपास २५ पेक्षा अधिक प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. गाडीच्या बॉनेटवर देखील प्रवासी बसल्याने चालकाला वळण रस्ता न दिसल्याने गाडी थेट कठड्याला जाऊन ठोकली गेली. या अपघातात बोनेटवर बसलेल्या चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

हेही वाचा -Murder in Pune : पुण्यात भरदिवसा बिल्डरची आर्थिक व्यवहारावरून गोळ्या झाडून हत्या; संशयित ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details