महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये १३ लाखांची रोकड जप्त; स्थिर सर्व्हेक्षण पथकाची कारवाई - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

नंदुरबार शहराजवळील पथराई फाट्याजवळआचारसंहिता स्थिर सर्व्हेक्षण पथकाकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

नंदुरबारमध्ये १३ लाखांची रोकड जप्त; स्थिर सर्व्हेक्षण पथकाची कारवाई

By

Published : Oct 10, 2019, 10:29 AM IST

Updated : Oct 10, 2019, 10:35 AM IST

नंदुरबार -विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या दरम्यान, निवडणूक आयोगाकडून अवैध रकमेबाबत कसून तपासणी सुरू आहे. या चौकशी दरम्यान एक बोलेरो वाहनातून आचारसंहिता स्थिर पथकाने १३ लाखांची रोकड जप्त केली आहे. ही रक्कम कोषागार विभागात जमा करण्यात आली असून पथकाचे कौतुक केले जात आहे.

हेही वाचा - देशांतर्गत विमान प्रवासावर 'विस्तारा'कडून ऑफर; ४८ तासात करावी लागणार बुकिंग

नंदुरबार शहराजवळील पथराई फाट्याजवळआचारसंहिता स्थिर सर्व्हेक्षण पथकाकडून विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता बोलेरो (क्र- जी.जे. 05 जे.एच.९८१४) वाहनाची तपासणी केली असता त्यात १३ लाख ९५ हजारांची रोकड सुटकेसमध्ये आढळून आली. वाहनात असलेले जयेशभाई पटेल, कमलेशभाई मोटेसिंग परमार, दिलीपभाई सोलंकी यांनी सदर रक्कम ही मजुरीचे पेमेंट असल्याचे सांगितले. वेळेच्या आत रक्कमेचा तपशिल सादर न करु शकल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रकमेचा पंचनामा करुन चौकशीसाठी सहाय्यक आयकर आयुक्त दिपक कुमार यांना सुचना दिल्या. संबंधीत रक्कम कोषागार विभागाकडे जमा करण्यात आली आहे.

हेही वाचा - शिवसेनेने पाच वर्षे सत्तेत असताना झोपा काढल्या का? - अजित पवार

Last Updated : Oct 10, 2019, 10:35 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details