महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bike Theft Case : 2 दुचाकी चोरांकडून 11 दुचाक्या जप्त; मालाची किंमत 6 लाख 70 हजार रुपये - Bike Theft Case

चोरीस गेलेल्या 6 लाख 70 हजार रुपये किमतीच्या 11 मोटरसायकली हस्तगत (Stolen two wheeler seized) करण्यात शहर पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी गुन्ह्यातील दोघांना अटक (two arrested in two wheeler theft case) करण्यात आली. Latest news from Nandurbar, Nandurbar Crime

Bike Theft Case
जप्त करण्यात आलेल्या दुचाक्या आणि पोलिसांची टीम

By

Published : Nov 22, 2022, 8:18 PM IST

नंदुरबार: शहरासह परिसरातून चोरीस गेलेल्या 6 लाख 70 हजार रुपये किमतीच्या 11 मोटरसायकली हस्तगत (Stolen two wheeler seized) करण्यात शहर पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी गुन्ह्यातील दोघांना अटक (two arrested in two wheeler theft case) करण्यात आली. त्याचप्रमाणे तालुका हद्दीतील चोरीस गेलेल्या कापूस व शेती साहित्य theft of cotton and agricultural materials चोरांच्या देखील मुसक्या पोलिसांनी आवळल्या असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील (Superintendent of Police PR Patil) यांनी दिली आहे. Latest news from Nandurbar, Nandurbar Crime

दुचाकी चोरांच्या अटकेबाबत बोलताना पोलीस अधिकारी

जगताप वाडीतून घेतले ताब्यात -नंदुरबार शहरातील जगतापवाडी परिसरातून विजय अंता पाडवी (वय 22)रा.मटावल ता.कुकरमुंडा जिल्हा तापी व विनेश लक्ष्मण पाडवी (वय 24) रा. जून उंटावतद ता.कुकरमुंडा जिल्हा तापी या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर पाटील यांनी मोटरसायकलीचे गुन्हे उघडकीस करण्याच्या सूचना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ३ पथक नेमले होते. गुन्हे शोध पथकाला मोटरसायकलची चोरी करणारे २ इसम हे जगतापवाडी परिसरात असल्याचे गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने जगतापवाडी परिसरात सापळा रचला.

पोलिसांच्या चलाखीने चोरटे थबकले-संशयित आरोपी हे एका मोटरसायकलवरून येत असतांना पथकाने त्यांना थांबवण्याचा इशारा केला. परंतु, ते पळून जाण्याच्या प्रयत्न करू लागले. शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अत्यंत चलाखीने ताब्यात घेरले. त्यांची कसून चौकशी केली असता विजय पाडवी, विनेश पाडवी यांनी मोटरसायकली चोरीची कबुली दिली.


11 दुचाकी केल्या हस्तगत -दोघांकडून 6 लाख 70 हजार रुपये किमतीच्या 11 मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. ही कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर पाटील,अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह पथकाने केली.


शेती साहित्यसह पिकांचे चोर अटकेत -जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेती साहित्याची चोरी होत असल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचबरोबर कापूस व सोयाबीन पिकांची देखील चोरी होत आहे. तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत कापूस चोरीच्या गुन्ह्यात एकाच अटक करण्यात आली आहे. याकडून चोरीस गेलेल्या साहित्याची माहिती पोलीस घेत आहेत.


किरकोळ कापूस विक्रेत्यांना दिल्या नोटीसा -गेल्या काही दिवसांपासून वेचणीला आलेला कापूस मोठ्या प्रमाणावर चोरीस जात होता. चोरी झालेला कापूस किरकोळ व्यापारी खरेदी करून घेत असल्याची माहिती पोलीस दलाला मिळाली त्यानुसार पोलीस झाला तर्फे जिल्ह्यातील किरकोळ कापूस व्यापाऱ्यांना नोटीसा दिल्या जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details