नांदेड-किनवट तालुक्यातील सहश्रकुंड परिसरात वनविभागाने निर्माण केलेल्या उद्यानाच्या मागे असलेल्या तलावाजवळ सेल्फी काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. सौरभ प्रकाश राठोड (वय १८ वर्ष) असे मृत तरुणाचे नाव आहे.
सहश्रकुंड परिसरातील उद्यानातील तलावात बुडून युवकाचा मृत्यू; 'सेल्फी'च्या नादात गमावला जीव
यंदा झालेल्या पावसामुळे सहश्रकुंड धबधबा चांगलच कोसळत आहे. हे दृश्य पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. याच धबधब्याच्या शेजारी असलेल्या उद्यानाच्या मागे असलेल्या तलावाजवळ सेल्फी काढण्यासाठी अनेक पर्यटक जात आहेत.
यंदा झालेल्या पावसामुळे सहश्रकुंड धबधबा चांगलच कोसळत आहे. हे दृश्य पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. याच धबधब्याच्या शेजारी असलेल्या उद्यानाच्या मागे असलेल्या तलावाजवळ सेल्फी काढण्यासाठी अनेक पर्यटक जात आहेत. किनवट तालुक्यातील रोड नाईक तांडा, वाळकी बु. येथील सरपंच प्रकाश राठोड यांचा मुलगा काही मित्रांसमवेत उद्यानात गेला होता.
फिरून झाल्यानंतर सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास पाठीमागे असलेल्या तलावाजवळ सेल्फी काढत असताना अचानक तोल गेल्याने तलावात पडला. त्यास पोहत येत नसल्याने त्याचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. सायंकाळी ५ वाजता त्याचे प्रेत तलावातून काढण्यात आले असून, या घटनेमुळे परिसरातील गावावर शोककळा पसरली आहे.