महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nanded Youth Died : धक्कादायक! डीजेच्या तालावर नाचताना तरुणाचा मृत्यू; पाहा व्हिडिओ - मृत्यू

रिसेप्शन पार्टीच्या दिवशी डीजेच्या तालावर नाचताना एका तरूणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील शिवणी येथे घडली. मृत्यम विश्वनाथ जानगेवाड असे मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Feb 26, 2023, 4:04 PM IST

डीजेच्या तालावर नाचताना तरूणाचा मृत्यू

नांदेड: नांदेडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. एका १९ वर्षीय तरुणाचा नाचता-नाचता मृत्यू झाला आहे. सदर घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अचानक हृदयविकाराचा झटका येऊन तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे गावात शोककळा पसरली. किनवट तालुक्यातील शिवणी येथील घटना आहे. रिसेप्शनच्या दिवशी डिजेच्या तालावर नाचताना मुत्यम जानगेवाड या तरूणाचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला.

तरूणाचा दुर्दैवी मृत्यू: किनवट तालुक्यातील शिवणी येथील नवतरुण मुत्यम विश्वनाथ जानगेवाड या वय १९ वर्षीय नवतरूणाचा डीजेवर नाचत असताना अचानक मृत्यू झाला. सदरील तरुण हा तेलंगणा राज्यातील म्हैसाजवळील पारडी या गावी गेला होता. २४ फेब्रुवारी रोजी लग्न समारंभानंतर २५ तारखेला सायंकाळी ७ वाजेच्या वेळी रिशेप्सन कार्यक्रम दरम्यान डीजे लावण्यात आले होते. या डीजे वर नाचत नाचता तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर या १९ वर्षाच्या तरुणाला हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू झाला, असे सांगितले जात आहे. या घटनेने शिवणी गावात हळहळ व्यक्त होत आहे.

लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत मृत्यू:मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवणी येथील मुत्तेन्ना जामगेवाड हा तेलंगणातील पार्डी येथे नातेवाईकाच्या लग्नात गेला होता. लग्नाच्या रात्री उशिरा कार्यक्रमात तेलगू चित्रपटातील गाण्यावर जबरदस्त डान्स करत असताना त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि क्षणात होत्याचे नव्हचे झाले.

व्हिडीओ व्हायरल:मुत्तेन्नाच्या या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की तरुण लग्नात खुप आनंदी आहे. आपला आनंद व्यक्त करत तो बराच वेळ एकटा नाचत असतो. वेगवेगळ्या स्टेप्स करून दाखवत तो डान्स करतो. अशातच त्याचा मृत्यू होतो.

लग्नघरात दुःखाचे वातावरण: डान्स पाहणाऱ्यांना सुरवातीला तो मसकरी करत स्वतःच पडला असेल असे वाटत होते. मात्र, थोडावेळ वाटपाहूनही तो उठला नसल्याने नातेवाईक जवळ जाऊन पाहतात, तेव्हा त्याला त्रास होत असल्याचे समजते. त्यानंतर नातेवाईक तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र मुतेन्नाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुन्नाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंब व नांदेडच्या शिवणी गावात हळहळ व्यक्त केली जातेय. हसत्या खेळत्या लग्नघरात असा प्रकार घडल्याने लग्नघरात दुःखाचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा:Narayanpur Naxal Atatck : छत्तीसगडमध्ये नक्षल्यांचे हल्ले सुरुच, आयईडी स्फोटात हेड कॉन्स्टेबल शहीद

ABOUT THE AUTHOR

...view details