नांदेड- येथे 'लघुशंका का करतोस' याचा जाब विचारत २ तरुणांना मारहाण झाली होती. यातील एका जखमी युवकाचा शुक्रवारी मृत्यू झाल्याने गुन्ह्यात कलम ३०२ ची वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या २ युवकांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱयांनी ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
'येथे लघुशंका का करतोस' म्हणत दोघांना जबर मारहाण; एकाचा मृत्यू - naded crime
किरकोळ कारणावरुन नांदेडात एकाचा खून झाला आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या २ युवकांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱयांनी ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
धुळवडीच्या दिवशी सायंकाळी ६ च्या सुमारास सुमित एकलारे आणि त्याचा मित्र शुभम हे दोघे रेल्वे डिव्हीजन कार्यालयासमोर थांबले होते. त्यावेळी तेथे ४ ते ५ युवक आले. त्यांनी शुभम आणि सुमितला येथे लघुशंका का करता? म्हणत लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत सुमितच्या छातीवर मार लागला. जखमी अवस्थेत सुमितला नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी सुमितचे वडील गुरूनाथ विश्वनाथ एकलारे यांच्या तक्रारीवरून विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
सुमित आणि शुभम यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी महम्मद सलमान उल्ला वसीफउल्ला, सय्यद सलमान सय्यद रहिम यांना अटक केली. त्यांचे फोटो दोघांना दाखवले असता सुमितने त्यांना ओळखले. शुक्रवारी दुपारी उपचारादरम्यान सुमितचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचे कलम वाढविण्याचा अर्ज न्यायालयाला सादर केला होता. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सय्यद सलमान सय्यद रहीम आणि महम्म्मद सलमान उल्ला वासीफ उल्ला (आसरा नगर, नांदेड) यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोघांना ७ दिवस पोलीस कोठडी दिली आहे.