नांदेड - सासऱ्याविरुद्ध तक्रार केल्याच्या कारणावरून एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी २ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सासऱ्यावर तक्रार केल्याच्या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण - नांदेड
आरोपींनी माझ्या सासऱ्याविरुध्द पोलिसात तक्रार का केली? असा जाब विचारत तरुणाला अश्लील शिवीगाळ केली. तसेच पट्ट्याने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.

शहरातील साठे चौक भागात राहणारा चेतासिंघ कामठेकर हा तरुण गाडीने गुरुद्वारा दर्शनासाठी जात होता. गेल्या १८ मार्चला सकाळी ११.३० वाजता त्याला हिंगोली उड्डाण पुलावर आरोपी जयदेवसिंग जिमीदार आणि संदीपसिंग बुंगई यांनी त्याला रोखले. तू माझ्या सासऱ्याविरुध्द पोलिसात तक्रार का केली? असा जाब विचारत अश्लील शिवीगाळ केली. तसेच पट्ट्याने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी चेतासिंग याने दिलेल्या तक्रारीवरून वजिराबाद पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बीट मार्शल ढगे करीत आहेत.