महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दोन पिस्तुलासह तरुणाला अटक, नांदेड पोलिसांची कारवाई - नांदेड जिल्हा लेटेस्ट न्यूज

हादगाव तालुक्यातील आष्टी येथील एका तरुणाकडे दोन पिस्तुल असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मालेगाव रोडवर असलेल्या भावसार चौकात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

Youth arrested with two pistols nanded
दोन पिस्तुलासह तरुणाला अटक

By

Published : Nov 14, 2020, 10:26 PM IST

नांदेड -हादगाव तालुक्यातील आष्टी येथील एका तरुणाकडे दोन पिस्तुल असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मालेगाव रोडवर असलेल्या भावसार चौकात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

गावठी पिस्तुलासह तीस हजार रुपये रोख रक्कम जप्त

त्याच्याकडून दोन पिस्तुल जप्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये एका गावठी पिस्तुलाचा समावेश आहे. तसेच आरोपीकडून 30 हजार रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची ही कारवाई महत्वाची मानण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details