नांदेड - नांदेडमध्ये क्षुल्लक कारणावरून भावानेच सख्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगणात थुंकल्याच्या वादातून ( spitting in the yard ) लहान भावाने मोठ्या भावाची निर्घुण हत्या ( younger brother killed older brother ) केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
लहान भावाकडून मोठ्या भावाचा खून -शुल्लक कारणावरुन रक्तातील नातं असलेल्या सख्या लहान भाऊ एकनाथने सख्या भाऊ सतीशचाच काटा काढला आहे. हि घटना नांदेडच्या शिवराय नगरमध्ये घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान भाऊ असलेला एकनाथ तुपसमूद्रे ( younger brother Eknath Tupasamudre ) आणि मोठा भाऊ सतीश तुपसमूद्रे ( Big brother Satish Tupasamudre ) यांच्यात अंगणात का थूंकल्यावरुन वाद झाला आणि वादाच रूपांतर भांडणात झाले. आणि काही समजण्याच्या आत अचानक लहान भाऊ एकनाथने रागाच्या भरात घरातून भाजी चिरण्याचा चाकू आणला. आणि सतीशच्या छातीवर रागाच्या भरात सपासप वार केले. काही कळण्याच्या आत सतीश रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.