महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडात खळबळ : माजी मंत्र्यांच्या घरात घुसला बंदूकधारी तरुण, केली खंडणीची मागणी, आरोपींना घेतले ताब्यात - नादेड न्यूज अपडेट

नांदेडमध्ये गुन्हेगारांची मजल आता वाढली आहे. येथील एका अज्ञात गुन्हेगाराने चक्क माजी राज्य मंत्र्यांच्या ( former minister D P Sawant in nanded ) घरात घुसून खंडणी मगितल्याची घटना घडली आहे. माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांच्या घरात हा थरकाप उडवणारा प्रकार घडला आहे. या घटनेने नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ( young man with gun broke into house )

young man with gun broke into house
माजी मंत्र्यांच्या घरात घुसला बंदूकधारी तरुण

By

Published : May 30, 2022, 6:32 PM IST

Updated : May 30, 2022, 8:01 PM IST

नांदेड -नांदेडमध्ये गुन्हेगारांची मजल आता वाढली आहे. येथील एका अज्ञात गुन्हेगाराने चक्क माजी राज्य मंत्र्यांच्या ( former minister D P Sawant in nanded ) घरात घुसून खंडणी मगितल्याची घटना घडली आहे. माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांच्या घरात हा थरकाप उडवणारा प्रकार घडला आहे. या घटनेने नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ( young man with gun broke into house )

माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांची प्रतिक्रिया

केली पन्नास हजाराची मागणी -ही घटना माजी उच्च शिक्षण मंत्री डी. पी. सावंत यांच्या शिवाजीनगर येथील आहे. या गुन्हेगाराने घरात घुसून किचनमध्ये असलेल्या नोकराला मारहाण केली. बंदुकीचा धाक दाखवीत ५० हजार रुपयाची मागणी केली, त्यानंतर त्याने डी.पी.सावंत यांच्याकडेही बंदुकीचा रोख दाखवित पैशाची मागणी केली.

आरोपी

बीड जिल्ह्याचा असल्याची दिली माहिती -सकाळी एक तरुण डी. पी. सावंत यांनी भेटला, त्याने आपण बीडचे आहोत. आपल्याला तुमची मदत पाहिजे. माझ्या शेतात काही लोक घुसखोरी करता आहेत, तुम्हीच मदत करू शकता, त्यानंतर सावंत यांनी त्याला तू पोलिसात तक्रार कर, मी तुझी मदत करू शकत नाही. असे सांगीतल्यानंतरही तो तरुण दुपारी पुन्हा घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवित धमकवण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे सावंत यांचे घर माजी मुख्यमंत्री तथा विध्यमां सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरासमोर हाकेच्या अंतरावर आहे. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या सावंत यांनी त्यांच्या घरासमोरील अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानाबाहेर असलेल्या सुरक्षारक्षकांना आवाज दिला, त्यानंतर त्या तरुणाने तिथून पळ काढला, या प्रकारामुळे पुन्हा एकदा नांदेडच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिह्न निर्माण झाले आहेत. पोलिसांनी सदरील तरुणाला ताब्यात घेतलं असून साहिल माने असं त्या तरुणाचे नाव आहे. त्या तरुणाने वापरलेली बंदूक खोटी असल्याचेही निष्पन्न झाले आहे.

पोलीस अधिकाऱ्याची प्रतिक्रिया

आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात - माजी मंत्री डी पी सावंत यांच्या घरात घुसून खंडणी मागणाऱ्या आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात आठरा वर्षीय साहिल माने आणि हर्षवर्धन कांबळे नामक आरोपीची पोलिसांनी चौकशी केली. दोघेही आरोपी नांनदेड येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या गुन्ह्यात वापरलेले हत्यार नकली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा -UPSC Topper Shruti Sharma : युपीएससीमधून देशात प्रथम आलेल्या श्रुती शर्माने यशाचे सांगितले 'हे' गमक

हेही वाचा - Piyush Goyal Filed Rajya Sabha Nomination : शिवसेनेने केलेला विश्वासघाताचा वचपा काढणार - पियूष गोयल

हेही वाचा - Rape Threat To Widow Women : 'विधवांचा सन्मान केल्यास त्यांच्यावर बलात्कार करू', निलम गोऱ्हेंच्या कार्यालयात आले धमकीचे पत्र

Last Updated : May 30, 2022, 8:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details