महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुलगा झाल्याच्या आनंदात वाटले पेढे... अन् तो निघाला करोना पॉझिटिव्ह! - नांदेडात पेढे वाटणारा तरुण कोरोना पॉझिटिव्ह बातमी

औरंगाबाद येथून चार जुलैला मुलगा झाला म्हणून मुलाला पाहण्यासाठी आलेला वडीलच कोरोनाबाधित असल्याचं समोर आल्या नंतर काटकळंबावासियांची झोप उडाली आहे. हा तरुण औरंगाबाद येथील एका कंपनीत काम करणारा मुलगा दिनांक 4 जुलैला आपल्याला मुलगा झाला म्हणून पाहण्यासाठी गावाकडं आला होता. तो आता कोरोनाबाधित आढळला आहे.

young man
मुलगा झाल्याच्या आनंदात वाटले पेढे.

By

Published : Jul 9, 2020, 10:58 AM IST

कंधार (नांदेड) - मुलगा झाल्याच्या आनंदात गावाला पेढे वाटणारा तरुणच करोना पॉझिटिव्ह निघाला. ही धक्कादायक घटना कंधार तालुक्यातील काटकळंबा गावात घडली. सदर तरुणाचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर हा प्रकार समोर आला. पेढे खाणाऱ्या आणि संपर्कात आलेल्या ११६ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या घटनेने काटकळंबा आणि परिसरात खळबळ माजली आहे.

मुलगा झाल्याच्या आनंदात वाटले पेढे.

काटकळंबा तालुका कंधार येथे एक रुग्ण कोरोना (वय 24 वर्ष) बाधित आढळल्याने काटकळंबा वाशी या सह परिसरात खळबळ उडाली प्रशासकीय यंत्रणेने आता खबरदारीची उपाय म्हणून परिसर सील केले आहे गावात आरोग्य कर्मचारी ची टीम व पोलीस तसेच सरपंच पोलिस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष यासह सामाजिक टीमची राबता वाढली आहे.

मुलगा झाल्याच्या आनंदात वाटले पेढे.

औरंगाबाद येथून चार जुलैला मुलगा झाला म्हणून मुलाला पाहण्यासाठी आलेला वडीलच कोरोनाबाधित असल्याचं समोर आल्या नंतर काटकळंबावासियांची झोप उडाली आहे. हा तरुण औरंगाबाद येथील एका कंपनीत काम करणारा मुलगा दिनांक 4 जुलैला आपल्याला मुलगा झाला म्हणून पाहण्यासाठी गावाकडं आला होता. तो आता कोरोनाबाधित आढळला आहे. आपल्या मुलाला पातंरड येथे भेटला व गावाकडे येऊन दोन दिवस उलटले त्याचा कुटुंबात आई वडील भाऊ-बहिण परिवारासह गावातच आजुळ मामा-मामीकडे भेटला व मुलगा झाला या आनंदात गावात व मित्र मंडळीत पेढे वाटप केले. त्याचा संपर्क आतापर्यंत 116 जणांसोबत आला आहे, त्या सर्वांना होम क्वारंटाईन केले आहे.

न्हाव्याकडे संपर्क झाल्यामुळे नऊ जणाला कंधार येथे स्वॅबसाठी हालविण्यात आले आहे. रुग्णांच्या घराचा परिसर कंटेंन्मेट झोन सील करण्यात आला आहे. तर ग्रामपंचायत कार्यालयाकडून गावामध्ये निर्जंतुकीकरण करण्याचे काम तातडीने चालू केले आहे. गावात भीतीचं वातावरण पसरू नये यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये, आरोग्य यंत्रणाही तत्पर आहे. बाहेर गावावरून आलेल्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी, अफवेवर विश्वास ठेऊ नये. तातडीचे काम असेलतरच घराबाहेर निघावे. मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्स पाळावे, असे आवाहन डाॅ. योगेश दुल्लेवाड वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केद्र बारुळ यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details