नांदेड- वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने लावलेल्या तार कुंपणात विद्यूत प्रवाह सोडल्यामुळे २५ वर्षीय तरुणाचा ८ जुलै रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणी सोनखेड पोलिस ठाण्यामध्ये ऑक्टोबरमध्ये शेतमालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा झाला आहे. तब्बल दोन महिन्यानंतर शेतमालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
लोहा तालुक्यातील सोनबर्डी माळ येथील गणेश बावणे या शेतकऱ्याने ऊसाच्या पिकाचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण व्हावे, यासाठी शेताच्या चहुबाजूंनी तारेचे कुंपन लावले होते. बावणे याने बेकायदेशीर रित्या विद्युत प्रवाहाच्या तारेवर आकोडे टाकून कुंपनाच्या तारेत विद्युत प्रवाह सोडला होता. विद्यूत प्रवाह सोडलेल्या या तारेला स्पर्ष होऊन अंकुश नरवाडे (२५) याचा ८ जुलै रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणी सोनखेड पोलिस ठाण्यामध्ये शेतमालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा झाला आहे.