महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू.. कारवाईसाठी नागरिकांचा रस्त्यावर 'ठिय्या' - अपघात बातमी नांदेड

शहरापासून काही अंतरावर असलेल्या गाडेगाव येथील तरुण शिवराज उबाळे हा शहरात कामानिमित्त आला होता. दरम्यान, दुचाकीवरुन गावाकडे जात असताना बायपास मार्गावर अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. यात वाहनाच्या चाकाखाली येवून शिवराजचा जागीच मृत्यू झाला.

young-man-dead-in-truck-bike-accident-in-nanded
young-man-dead-in-truck-bike-accident-in-nanded

By

Published : Feb 22, 2020, 5:25 PM IST

नांदेड- गाडेगाव येथील तरुणाचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. शिवराज उर्फ राजीव अशोक उबाळे (वय २७ रा.गाडेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. अपघात इतका भीषण होता की तरुणाच्या दुचाकीचाही चुराडा झाला आहे.

हेही वाचा-एसटी चालकामळे मुलीचा पाय गमावला; कुटुंबियांची महामंडळाकडे पुर्नवसनाची मागणी

शहरापासून काही अंतरावर असलेल्या गाडेगाव येथील तरुण शिवराज उबाळे हा शहरात कामानिमित्त आला होता. दरम्यान, दुचाकीवरुन (एम.एच.२६ बी.जी.५३८५) गावाकडे जात असताना बायपास मार्गावर अज्ञात वाहनाने त्याला जबर धडक दिली. यात वाहनाच्या चाकाखाली येवून शिवराजचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडताच धडक दिलेल्या चालकाने वाहनासह पलायन केले.

अपघाताची माहिती मिळताच गाडेगाव येथील नागरिक घटनास्थळी जमा झाले होते. दरम्यान, धडक देवून पळून गेलेल्या ट्रकचालकास अटक करण्याच्या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. विमानतळ ठाण्याचे पोलीस निरिक्षक संजय ननवरे हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातातील वाहन चालकास ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. शिवराज हा विवाहित होता, त्याच्या पश्चात पत्नी दोन मुले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details