नांदेड: शनिवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास सोनखेड रोडवरील खरबी फाटा जवळ कोबीने भरलेली बोलेरो पिकअप गाडी पलटी झाली होती. यात तीन जण जखमी झाले होते. ही माहिती मिळाल्यानंतर देगलूर नाका येथील रहिवासी शेख अफजल हा मदतीसाठी घटनास्थळी पोहचला. यावेळी अपघातातील जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी त्याने मदत केली. त्यानंतर बोलेरो पिकअप गाडीमधील गोबी इतर वाहनामध्ये भरण्यासाठी वाहन रोडच्या कडेला थांबले. यावेळी यवतमाळकडे जाणाऱ्या सिमेंटच्या ट्रेलरने त्या तरुणास चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर सोनखेड पोलिसांनी वाहनासह चालकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली होती.
Youth Killed In Accident: अपघातानंतर मदतीला धावून आलेल्या तरुणावर नियतीचा घात; सिमेंट ट्रेलरने चिरडले - Young man crushed by cement trailer
अपघातानंतर मदतीला धावून आलेल्या एका तरुणाला सिमेंटच्या ट्रेलरने चिरडले. या अपघात ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सोनखेड परिसरातील खरबी फाटा जवळ शनिवारी रात्री हा अपघात झाला. अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव शेख अफजल असे आहे.
तरुणाला सिमेंट मिक्सरने उडवले: पो. स्टे. सोनखेड हद्दीत दि. 16 रोजी 12.30 च्या सुमारास मौजे खरबी पाटी येथे राष्ट्रीय महामार्गावर पिकअप क्रमांक MH 44 U 7861 नागपूर कडे जात असताना पलटी झाला होता. त्यावेळी चालक, वाहक हे किरकोळ जखमी झाले होते. जखमी झालेल्या व्यक्तीस काढण्यासाठी नांदेडवरून दोन तरुण आले होते. सदर पिकअपमध्ये फुलगोबी होती. तो फुलगोबीचा माल दुसऱ्या पिकअपमध्ये शिफ्ट करताना मागून येणाऱ्या सिमेंट मिक्सरने युवकाला उडवले. शेख अफजल (वय वर्ष 30, रा. देगलूर नाका, नांदेड) असे या तरुणाचे नाव आहे. पिकअप मधील माल दुसऱ्या गाडीत टाकत असताना रस्त्यावर आला. यावेळी यवतमाळकडे MH 29 BE 3395 क्रमांकाचा सिमेंट मिक्सर जात होता. त्या सिमेंट मिक्सरने धडक दिल्याने शेख जखमी झाला होता. उपचारासाठी नेत असताना युवकाचा मृत्यू झाला आहे.
कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू:या अपघातात तीन जण गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सिमेंट मिक्सर पोलीस ठाण्यात आणून लावण्यात आले असून चालकास ताब्यात घेण्यात आले आहे. चालकावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सोंनखेड पोलीस करीत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.