नांदेड - सोशल मीडियावर पोस्ट टाकत एका 25 वर्षाच्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या ( Young Man Commit Suicide ) केल्याची घटना घडली आहे. बिलोली तालुक्यातील तोरणा येथे ही घटना घडली आहे. बागेश्वर नरवाडे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पाच जणांविरोधात गुन्हा दाखल -
मयत तरुण बागेश्वर नरवाडे विरोधात नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल होता आणि तो जामीनावर सुटला होता. "मुलीचे नातेवाईक असलेल्या पाच जणांनी मला या प्रकरणात अडकवून माझी बदनामी केली. आणि मी जामीनावर सुटल्यानंतर ही लोक त्रास देत आहेत म्हणून मी आत्महत्या करत आहे. त्या पाच जणांना कडक शिक्षा करावी, माझ्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना त्रास देऊ नका असे म्हणत बागेश्वर नरवाडे याने सोशल मीडियावर पोस्ट टाकून गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.