नांदेड- शहरातील एका प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक करावी यासाठी एका तरुणीने पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ही घटना घडली.
शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणीने काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात काही जणांविरुध्द तक्रार दिली होती. या प्रकरणातील आरोपींना अजून अटक झालेली नाही. त्यामुळे या तरुणीने रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाणे गाठले. तिने पोलीस निरीक्षक ए. एन. नरुटे यांच्या कक्षात जाऊन आरोपींना अद्याप अटक का केली नाही? याचा जाब विचारला. तेव्हा नरुटे व सहकारी तिची समजूत काढत असतानाच तिने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.