नांदेड- माहूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या बोरवाडी शिवारात शेतात काम करीत असलेल्या तरुण शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केला. अचानक केलेल्या या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर पुसद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अस्वलाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी गंभीर जखमी, उपचार सुरु
प्रफुल्ल जवाहरलाल पवार (वय २१) असे शेकऱ्याचे नाव आहे. प्रफुल्ल हा शेतात काम करत असताना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्याच्यावर अचानक अस्वलाने हल्ला केला. यात प्रफुल्लच्या उजव्या मांडीला तसेच डाव्या पायाला दुखापत झाली.
अस्वलाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी गंभीर जखमी
प्रफुल्ल जवाहरलाल पवार (वय २१) असे शेकऱ्याचे नाव आहे. प्रफुल्ल हा शेतात काम करत असताना दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास त्याच्यावर अचानक अस्वलाने हल्ला केला. यात प्रफुल्लच्या उजव्या मांडीला तसेच डाव्या पायाला दुखापत झाली.
जखमीवर यवतमाळ येथील फुलसावांगी जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. यानंतर पुढील उपचारासाठी पुसद येथे हलविण्यात आले. या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते मनोज किर्तने यांनी वनपाल सोनकांबळे यांना दिली आहे.