नांदेड - जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उंचाडा या गावात भरदिवसा एका तरुण शेतकऱ्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. अवैध वाळू वाहतुकीत अडथळा ठरत असल्याने वाळू माफियाने तरुण शेतकऱ्याची हत्या केल्याची माहिती मिळत आहे. शिवाजी कदम असे मृताचे नाव आहे.
हदगावमध्ये वाळूमाफीयाने केली तरुण शेतकऱ्याची हत्या हेही वाचा -
३५ वर्षीय शिवाजी कदम यांचे कयाधू नदीकाठी शेत आहे. या नदीतून आरोपी त्र्यंबक चव्हाण आणि त्याचे साथीदार बेकायदेशीररित्या वाळू उपसा करत होते. आज (सोमवारी) दुपारी मृत शिवाजी कदम यांनी शेतातील उसाला पाणी दिले. त्यामुळे रस्त्यावर चिखल झाला होता. चिखल झाल्याने वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर येऊ शकले नाही. याच कारणातून त्र्यंबक चव्हाण याने शिवाजी कदम सोबत वाद घातला आणि धारदार शस्त्राने वार केले. यात शिवाजी कदम यांचा मृत्यू झाला.
कयाधू नदीतून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असताना पोलीस किंवा महसूल विभागाने कुठलीच कारवाई केली नाही. वेळेत जर वाळू माफियांवर कारवाई झाली असती तर कदाचित तरुण शेतकऱ्याचा बळी गेला नसता, अशी चर्चा परिसरात होत आहे.
हेही वाचा -