महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Dhantrayodashi : केवळ भारतानेच नव्हे तर विश्वाने मान्य केली आयुर्वेद उपचार पद्धती, आयुर्वेदाचे जनक धन्वंतरी यांची जयंती - धन्वंतरी जयंती

आज (Dhantrayodashi) धनत्रयोदशी. आयुर्वेदाचे जनक धन्वंतरी यांची जयंती. आयुर्वेद केवळ उपचार पद्धती नाही आहे. तर ती भारतीय जीवन शैली आहे. आज संपूर्ण जगाने ही शैली (world accepted Ayurveda treatment method) स्वीकारली आहे. यावरुन आयुर्वेदाचे महत्व कळून येते. Dhanwantari is father of Ayurveda . Today Dhanwantari Jayanti .

Dhantrayodashi
आयुर्वेदाचे जनक धन्वंतरी

By

Published : Oct 22, 2022, 4:39 PM IST

नांदेड : समुद्र मंथनातून जी चौदा रत्न बाहेर पडलीत, त्यातील बारावे रत्न म्हणजे (Dhantrayodashi) धन्वंतरी. त्यांनी येताना अमृतकलश सोबत आणला. या अमृतकलशासोबत आयुर्वेद आणला. सत्ययुगात धन्वंतरीच्या आयुर्वेदाचा फायदा केवळ देवादिकांनाच होत असे. या ज्ञानाचा फायदा जनकल्याणासाठी (world accepted Ayurveda treatment method) व्हावा म्हणून भगवान विष्णुनं धन्वंतरींना मानवी युगात जन्माला जाण्यास सांगितले. विष्णुच्या आज्ञेवरुन धन्वंतरींनी द्वापारयुगात काशीला धन्वच्या पोटी जन्म घेतला. त्यामुळे नाव धन्वंतरी पडले. आयुर्वेदात यांनाच धन्वंतरी द्वितीय म्हणून ओळखले जाते. आताचे आयुर्वेदाचे जनक (Dhanwantari is father of Ayurveda) त्यांनाच म्हटले जाते. Today Dhanwantari Jayanti

प्रतिक्रिया व्यक्त करतांना आयुर्वेदाचे डॉक्टर


आधुनिक उपचार पद्धतींनी विज्ञान युगात मोठी प्रगती केली आहे. त्याचा मानवाला चांगला फायदाही होत आहे. त्यासोबतच होमियोपॅथी, युनानी अशा विविध उपचार पद्धतीही उपलब्ध आहेत. या सर्व पद्धतीत आयुर्वेद ही सर्वांत पुरातन आहे. पण विज्ञान युगात उद्भवणाऱ्या व्याधीवरही यात उपचार उपलब्ध आहे, हे आयुर्वेदाचे वैशिष्ट्य आहे. आधुनिक उपचार पद्धतीत रोगावर इलाज आहे. पण रोग होऊ नये, यासाठी काहीही सांगितलेले नाही. याउलट आयुर्वेदात रोगमुक्त जीवनासाठी आचार संहिता सांगितली आहे. त्या पद्धतीने माणसाने आपले जीवन जगले तर, कोणतीही व्याधी त्याच्या जवळपास फिरकणार नाही. अशी आचार संहिता सांगणारे आयुर्वेद हे एकमेव आहे. त्यामुळे आयुर्वेदाला केवळ उपचार पद्धती न म्हणता भारतीय जीवन पद्धती असे म्हटले जाते.

आयुर्वेद केवळ शरीर स्वास्थ देणारे शास्त्र नाही. मनाची शुद्धता करणारेही ते शास्त्र आहे. अनेक आजार हे मनाच्या कमजोर पणामुळे जडत असतात. मन स्वस्थ राहिले, तर शरीर स्वस्थ राहते. त्यामुळे रोगाचा हल्ला होऊ नये, यासाठी आयुर्वेदाने शारिरीक व्यायामासोबत मानसिक व्यायामही सांगितले आहे. आज ही उपचार पद्धती जगाने मान्य केली आहे. आयुर्वेदातील योगासने आज योगा या नावाने जगभर केली जातात. त्याचा फायदा केवळ भारतीयांनाच नाही तर, विश्वातील लोकांनाही होतोय. त्यामुळे आयुर्वेद ही या देशाने जगाला दिलेली देणगी आहे, असे म्हटले जाते.


धन्वंतरी द्वित्तीय यांना चिकित्सा शास्त्र, शल्य शास्त्र, अश्व, गज व मंत्र शास्त्र आदिंचे सखोल ज्ञान होते. त्यांनी या ज्ञानाद्वारे सर्व प्राणी मात्रांना आरोग्य तर प्रदान केलेच, पण आपल्या शिष्यांना या शास्त्राचे ज्ञान देऊन आयुर्वेदाचा प्रसार केलाय. त्यांच्या या कार्यामुळेच आयुर्वेदाचा प्रसार देशभर होऊ शकला. कोट्यावधी व्याधीग्रस्तांना त्यापासून दिलासा मिळू लागलाय. आज या प्रणालीचा स्वीकार विश्वाने केला आहे. त्यामुळे देशाचा नावलौकिक तर वाढलाच पण, त्यासोबतच विश्वाल एक नवी जीवनशैली मिळाली. धन्वंतरी पुजनाच्या निमित्ताने ही जीवन शैली स्वीकारण्याची प्रतिज्ञा प्रत्येकाने केली, तर अनेक समस्या सुटू शकतील. Today Dhanwantari Jayanti

ABOUT THE AUTHOR

...view details