नांदेड - काही पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेतला आहे. त्याबाबत सरकार आपली बाजू हायकोर्टात मांडेल. परंतु, अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्यामुळे शिवस्मारकाचे काम बंद आहे, अशी माहिती माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. चव्हाण आज नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
पत्रकारांशी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण 'फडणवीसांच्या काळातील काही मुद्दे'
शिवस्मारकाबद्दल पर्यावरणवादी लोकांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. तसेच, फडणवीस सरकारच्या काळातील काही मुद्दे आहेत. त्या सर्व प्रश्नांना सभागृहात उत्तरे दिले आहेत. परंतु, याबाबत संभ्रम निर्माण करण्याचे बऱ्याचदा विरोधकांकडून होत आहे. परंतु, हा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे जेव्हा न्यायालयात बाजू मांडण्याची वेळ येईल तेव्हा या सर्व मुद्यांवर सरकार आपली बाजू मांडणार आहे. मात्र, हा मद्दाच न्यायप्रविष्ट असल्याने हे शिवस्मारकाचे काम सध्या थांबलेले आहे असे स्पष्टीकरण चव्हाण यांनी यावेळी दिले आहे.
हेही वाचा -भाजप सरकारचा शिवस्मारकात कोट्यवधींचा भ्रष्टाचार; काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप