लिंग परिवर्तनासाठी महीला पोलिसाचा दोन वर्षापासुन संघर्ष नांदेड:नांदेडच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल वर्षा उर्फ विजय पवार, वय 36 यांनी हायकोर्टात लिंग बदलासीठी याचिका केली आहे. आपल्याला शस्त्रक्रिया करुन पुरुष व्हायचे आहे. यासाठी एक महिन्याची रजा मिळावी. तसेच या शस्त्रक्रियेचा खर्चही राज्य सरकारने करावा, अशी मागणी या महिला पोलीस कर्मचाऱ्याने केली आहे. पवार यांच्या याचिकेवर 1 फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली.
मनात कायमच पुरुषी भावना:वडिलांच्या निधनानंतर पवार यांनी एप्रिल 2005 मध्ये अनुकंपा तत्वावर पोलीसात भरती झाल्या होत्या. मे 2012 मध्ये त्या नाईक झाल्या. बहिणीसारखी एक स्त्री म्हणून दिसत असले तरी मनात कायमच पुरुषी भावना येत होत्या, असे त्यांनी याचिकेत नमूद केले होते. डिसेंबर 2018 मध्ये केलेल्या चाचणीत आपण पुरुष असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सेंट जॉर्ज हस्पिटलनेही चाचणीचे रिपोर्ट बरोबर असल्याचे म्हटले आहे. तसेच शस्त्रक्रिया करुन लिंग बदल करुन घेण्याचा सल्ला दिला आहे. एप्रिल 2021 मध्ये दिल्लीमधील हॉस्पिटलनेही त्या मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे म्हटले आहे.
अधीक्षकांना पत्र लिहून केली विनंती:समस्या सोडवण्यासाठी पवार यांनी आपली व्यथा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. मात्र, कोणत्याही अधिकाऱ्याने त्यांच्या मागणीची आणि विनंतीची दखल घेतली नाही. त्यामुळे ऑगस्ट 2022 मध्ये नांदेड पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून विनंती केली. यानंतर डिसेंबर 2022 मध्ये त्यांनी पोलीस महासंचालक यांना पत्र लिहून लिंग बदल शस्त्रक्रियेसाठी परवानगी देण्याची नियमात तरतूद नसल्याने मार्गदर्शन करावे असे पत्रात म्हटले. त्यानंतर पोलीस महासंचालकांनी त्यांना नकार दिला.
हायकोर्टात याचिका दाखल: पोलीस अधिकाऱ्यांकडून काहीच मदत होत नसल्याने अखेर पवार यांनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला. अॅड. एजाज नक्वी यांच्या मार्फत त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. शारीरिक बदल हा नैसर्गिक आहे व मानसिकदृष्ट्या त्या पुरुषी आहेत. त्यामुळे इच्छेनुसार जीवन जगण्याचा त्यांचा मूलभूत हक्क असल्याचे याचिकेत म्हटले आहे. तसेच आपले लिंग बदल शस्त्रक्रिया करुन आपले नाव बदलून विजय पवार असे नाव करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी याचिकेतून केली.
यापुढे लढा सुरूच ठेवणार: नांदेड पोलीस दलात वर्षा पवार ही ( 35 वर्षीय ) महिला मागील 18 वर्षापासून पोलिस खात्यात कार्यरत आहे. सध्या त्या मनाठा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. स्त्री असून ही वर्षा असली तरी पुरुष असल्याचा भावना निर्माण होत असतात. डॉक्टरकडे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांने जेंडर डीस्पोसीया असल्याच सांगितले. लिंग परिवर्तनाच्या परवानगीसाठी सुरुवातीला पोलीस अधीक्षक आणि त्यानंतर वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे तीने विनंती केली. मात्र कुठलाच निर्णय न आल्याने तिने मुंबईच्या हायकोर्टात याचिका दाखल केली. एक फेब्रुवारी रोजी न्यायालयाने मॅटमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यापुढे लढा सुरूच ठेवणार असल्याचे वर्षा यांनी सांगितले.
सानवी जेठवानी यांची वर्षाला साथ: सानवी जेठवानी यांनी सांगितले की, लिंग परिवर्तन केलेल्या नांदेड मधिल सानवी जेठवानी यांची वर्षाला साथ दिली. सानवी यादेखील पण काही महिन्यापूर्वी लिंग परिवर्तन करून पुरुष असतांना महिला झाल्या आहेत. तर पोलीसदलाकडून याबाबत शासनाकडे महिती सादर करण्यात आली आहे. लिंग परिवर्तनासाठी लागणारा खर्च त्या महीलेने शासनाकडे मागितला. तर त्याचा अहवाल पाठविण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.
हेही वाचा:Nanded police अर्धनग्न करून पोलीसांकडून युवकांना मारहाण पोलिसाला केले निलंबित