नांदेड- जिल्ह्यातील देगलूरहून काठेवाडी गावाकडे जाणाऱ्या मार्गावर दुचाकीला रानडुकराने जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
रानडुकराच्या धडकेत महिलेचा मृत्यू; नांदेडच्या देगलूर तालुक्यातील घटना - रानडुकराच्या धडकेत महिलेचा मृत्यू
देगलूर तालुक्यातील काठेवाडी येथील बाबुराव सखाराम भगनूरे (वय ५५) व त्यांच्या पत्नी छायाबाई भगनूरे (५०) हे दोघे सोमवारी रात्री देगलूर येथून काठेवाडीकडे निघाले होते. कुशावाडी ते होट्टल दरम्यान रानडुकराने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली.
देगलूर तालुक्यातील काठेवाडी येथील बाबुराव सखाराम भगनूरे (वय ५५) व त्यांच्या पत्नी छायाबाई भगनूरे (५०) हे दोघे सोमवारी रात्री देगलूर येथून काठेवाडी कडे निघाले होते. कुशावाडी ते होट्टल दरम्यान रानडुकराने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही मोटारसायकलवरून खाली पडले. छायाबाई भगनूरे यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, बाबुराव भगनूरे यांना ही गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर उप जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मात्र, पत्नीच्या अंत्यविधीसाठी ते गंभीर अवस्थेतच काठेवाडी येथे मंगळवारी परतले. दुपारच्या सुमारास छायाबाई यांच्या पार्थिवावर काठेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, देगलूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास जमादार माधव पल्लेवाड करत आहेत.