महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nanded Crime News: खळबळजनक! तपोवन एक्सप्रेसच्या टॉयलेटमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; घातपाताची शक्यता - नांदेड गुन्हेगारी

नांदेड रेल्वे स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी तपोवन एक्सप्रेसमध्ये टॉयलेटमध्ये महिलेचा मृतदेह आढळला आहे. घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुढील तपास सुरू आहे.

Nanded Crime News
महिलेचा मृतदेह

By

Published : Mar 24, 2023, 8:16 AM IST

नांदेड : नांदेडमधील वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण आपल्याला माहितच आहे. अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. रेल्वेच्या शौचालयामध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही महिला सुई धागा विकून उदरनिर्वाह करत होती. तिचा मृतदेह हा रेल्वेच्या शौचालयात सापडला. नांदेड ते मुंबई असे धावणाऱ्या तपोवन एक्सप्रेसच्या शौचालयात हा मृतदेह सापडला आहे. पोलिसांकडून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.







महिलेचा मृत्यू नेमका कसा झाला :मयत महिला ही ३० ते ३५ वर्ष वयोगटातील आहे. पोलिसांनी रेल्वे कोचच्या टॉयलेटमध्ये असलेल्या या मृतदेहाचा पंचनामा केला, त्यावेळी महिलेच्या उजव्या गालावर खरचटलेले असल्याचे आढळले. तसेच तोंडामधून रक्तस्त्राव देखील येत होता. पोलिसांनी महिलेचा मृत्यू नेमका कसा झाला, हे शवविच्छेदन अहवालानंतरच समजेल, असे सांगितले. सोशल मीडियावर या घटनेची माहिती प्रचंड व्हायरल होत आहे. यासंबंधी पोलिसांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. घटना काय आहे? ते समजून घ्यावी व अन्य कुठलाही मजकूर टाकू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.





रेल्वेच्या टॉयलेटमध्ये मृतदेह : तपोवन एक्सप्रेस नांदेड रेल्वे स्थानकातून नांदेड- मुंबई दररोज धावते. ही रेल्वे गुरूवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुंबईकडे जाण्यासाठी प्लॅफॉर्मवर उभी होती. त्यावेळी पोलिसांना रेल्वेच्या डी ८ कोचमधील टॉयलेटमध्ये मृतदेह असल्याची माहिती मिळाली होती. नांदेड रेल्वे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश उनावणे, कर्मचारी कांचन राठोड, युवराज लव्हाळे, मनोज वानखेडे, किरण राठोड यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. त्यानंतर विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या महिलेची ओळख दुपारी दोन वाजेपर्यंत पटलेली नव्हती.







गुन्हेगारीचे वाढते प्रमाण : नुकतेच नाशिकमध्ये एका आईने आपल्या तीन महिन्याच्या चिमुकलीचा खून केल्याची घटना घडली होती. मुंबईमध्ये हॉटेलमध्ये कच्चा पुलाव दिल्याच्या वादामधून चाकू हल्ला झाल्याची घटना देखील घडली होती. आता नांदेडमध्ये रेल्वेच्या टॉयलेटमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा घातपाताचा प्रकार आहे की नाही, याबाबत चर्चा होताना दिसत आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details