नांदेड :काँग्रेसच्या एका महिला कार्यकर्तीवर गोळाबार झाल्याची घटना घडली आहे. जखमी सविताला विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात ( Vishnupuri Government Hospital ) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ( Woman Congress Worker firing )
हल्लेखोरांनी केला गोळीबार :पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बाफना पुलावरून मगनपुराच्या दिशेने स्कूटीवरून जात असलेल्या सविता गायकवाड ( Savita Gaikwad ) यांना रात्री ११.१० वाजेच्या सुमारास परभणी येथील रहिम खान, जाफर व एक अनोळखी रहिवासी या तिघांनी अचानक अडवले. सोमवार, 9 जानेवारी रोजी तिघांचा सविता यांच्याशी वाद झाला, यादरम्यान हल्लेखोरांनी सवितावर रिव्हॉल्व्हरने गोळीबार केला. त्यात सविताच्या डाव्या हाताला गोळी लागली. या प्रकरणाची माहिती मिळताच इतवारा पोलीस ठाण्याचे ( Itwara Police Station ) निरीक्षक भगवान धबडगे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून जखमी सविता यांचा आढावा घेतला. सविता यांना पोलिसांच्या वाहनातून विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. तर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.