नांदेड - लॉकडाऊनच्या काळापासून बंद वाइनशॉप आजपासून उघण्याची परवानगी जिल्हाधिकारी यांनी दिली होती. त्यामुळे आज सकाळपासून वाइन शॉप उघडण्यात आले असून मद्यखरेदीसाठी मोठ्या रांगा दिसून आल्या आहेत.
नांदेडमध्ये दारूची दुकाने उघडली, मद्यप्रेमींच्या सकाळपासून रांगा - नांदेडमध्ये दारुची दुकाने उघडली
लॉकडाऊननंतर बंद झालेली दारुची दुकाने आजपासून उडण्यात आली आहेत. सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत ही दुकाने सुरू राहतील. त्यामुळे आज सकाळपासूनच मद्यप्रेमींनी दुकानासमोर रांगा लावल्याचे चित्र नांदेडमध्ये पाहायला मिळाले.
![नांदेडमध्ये दारूची दुकाने उघडली, मद्यप्रेमींच्या सकाळपासून रांगा Wine shop reopen in Nanded](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7260593-961-7260593-1589883034081.jpg)
जिल्ह्यातील मद्यशौकिनांसाठी आता खूष खबर आहे. जवळपास 57 दिवसापासून कोरडा पडलेल्या मद्यशौकीनांचा घसा मद्याने ओला होणार आहे. लॉकडाऊनच्या काळापासून बंद असलेली वाइन्स शॉप आज सकाळपासून जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत उघडण्यात आली आहेत. वाइनशॉप उघडताच मद्यप्रेमींची दुकानासमोर खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून येत आहे.
जवळ-जवळ दोन महिन्यापासून मद्य न मिळालेल्या मद्यप्रेमींनी आज वेगवेळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. शहरातील अनेक वाइनशॉपच्या समोर लाकडी बॅरिकेट लावून खासगी सुरक्षा रक्षकांच्या व पोलिसांच्या मदतीने सुरक्षित अंतर ठेवत मद्यविक्री सुरू झाली असून, दोन महिन्यांपासून कळ सोसलेल्या मद्यप्रेमींचा आनंद मावनेसा झाला आहे.