महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामाला लगेच सुरुवात करणार'

महाविकास आघाडी सरकारमध्ये अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार देण्यात आला. पक्षातील नेत्यांनी माझ्या बाबतीत जो निर्णय घेतला, त्या प्रमाणे आपण काम करू अशी, प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

बांधकाम खात्याच्या कामाला लगेच सुरुवात
बांधकाम खात्याच्या कामाला लगेच सुरुवात

By

Published : Jan 5, 2020, 1:50 PM IST

नांदेड - खातेवाटपाचा संपूर्ण अधिकार पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना आहे. त्यांनी माझ्या बाबतीत जो निर्णय घेतला, त्या प्रमाणे आपण काम करू अशी, प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. खातेवाटप जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच ते पत्रकारांशी बोलत होते. उद्यापासून लगेचच खात्याच्या कामाला लागणार असल्याचेही चव्हाण म्हणाले.

बांधकाम खात्याच्या कामाला लगेच सुरुवात


सार्वजनिक बांधकाम हा विभाग पूर्वी सांभाळला असून, या खात्याचा अनुभव आहे. बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची सोमवारी मुंबईत बैठक बोलावली आहे. चव्हाण यांनी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज नांदेडमध्ये झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. जिल्ह्यातील विविध खात्यांच्या अधिकारी वर्गाची बैठक त्यांनी बोलावली होती. जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सगळे मिळून काम करणार असल्याचे चव्हाणांनी सांगितले.


दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याबाबत बोलण्याचे त्यांनी टाळले. तो विषय शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे, मुख्यमंत्री ठाकरे त्यावर निर्णय घेतील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details