महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रसंगी मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी छातीवर गोळ्या झेलू - अशोक चव्हाण - Vidhansabha 2019 bhokar nanded

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोकर येथे अशोक चव्हाण यांनी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी भव्य रॅली काढली होती. त्यानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी चव्हाण पुढे बोलताना म्हणाले, देशातील तरुणाला दिशा देण्याची गरज आहे. त्यांच्या हाताला काम देण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील तरुणांचे भविष्य घडविण्यासाठी मी आपल्या सोबत आहे. तसेच मराठवाड्यातील प्रश्नांसाठी झगडण्यासाठी मी नेहमी तत्पर आहे. मी कुठेही असलो तरी नांदेड व भोकर कधीही मागे पडणार नाही, याची काळजी घेतली आहे.

भोकर येथे काँग्रेसने शक्तिप्रदर्शन करण्यासाठी रॅली काढली होती.

By

Published : Sep 30, 2019, 9:29 AM IST

नांदेड - आमच्या हक्काचे पाणी पळवू नका, हा आगामी विधानसभा निवडणुकीत हा माझा प्रचाराचा प्रमुख मुद्दा असणार आहे. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. प्रसंगी पाण्यासाठी छातीवर गोळ्या झेलू, असा सज्जड इशारा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे. तर आता पाणी पेटले आहे. आमची लढाई अस्मितेची आहे, असेही ते म्हणाले.

भोकर येथे काँग्रेसने शक्तिप्रदर्शन करण्यासाठी रॅली काढली होती.

हेही वाचा -सरकारचा कांदा निर्यातबंदीचा निर्णय म्हणजे शेतकऱ्याला मातीत घालण्याचे षडयंत्र - डॉ. अजित नवले

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोकर येथे अशोक चव्हाण यांनी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी भव्य रॅली काढली होती. त्यानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी चव्हाण पुढे बोलताना म्हणाले, देशातील तरुणाला दिशा देण्याची गरज आहे. त्यांच्या हाताला काम देण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील तरुणांचे भविष्य घडविण्यासाठी मी आपल्या सोबत आहे. तसेच मराठवाड्यातील प्रश्नांसाठी झगडण्यासाठी मी नेहमी तत्पर आहे. मी कुठेही असलो तरी नांदेड व भोकर कधीही मागे पडणार नाही, याची काळजी घेतली आहे. मला इथेच राहायचे आणि इथे मरायचे आहे. तुमचा आवाज मुंबई पर्यंत पोहोचविण्यासाठी कुणीतरी पाहिजे आहे. म्हणूनच मी आता मैदानात उतरला आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा -...त्यामुळे गौतम बुद्ध जेवढे महत्वाचे तेवढेच छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज - खासदार संभाजीराजे

नांदेडहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वरात गेली. मात्र, नांदेडला टूलू मिळालं काय ? असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. येथील विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई करून लोकशाहीचा आवाज दाबल्या जात आहे. ही लोकशाही आहे की ठोकशाही ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. आमच्या धमन्यात स्वातंत्र्यसैनिकांचे रक्त आहे. असे कितीही मुख्यमंत्री आले तरी घाबरत नाही. जिल्ह्यातील आणि मतदारसंघातील प्रत्येक माणसाला आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपला हक्काचा माणूस पाहीजे. यासाठी पुन्हा एकदा भोकर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा -भाजपने दिले भाजीवाल्याच्या मुलाला विधानसभेचे तिकीट

या सरकारमध्ये एक प्रश्न विचारला तर उत्तर काही तरी भलतंच मिळत आहे. अशी वेगळीच अवस्था राज्यात झाली आहे. मी मुख्यमंत्री असताना तातडीने कर्जमाफी दिली होती. पण अजूनही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच मिळाला नाही. हे केवळ लबाडांचे सरकार आहे, असा आरोप त्यांनी केला. ग्रामीण भागातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मी तत्पर आहे. सुधा प्रकल्पाची उंची वाढविणे, भोकर तालुक्यातील पाण्यासाठी विविध योजना आणू तसेच पाण्याचा प्रश्न युद्ध पातळीवर सोडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, असे ते म्हणाले. तर तुमच्या-आमच्या वाटण्या करून आयत्या पिठावर रांगोळ्या ओढल्या. आणि आता म्हणत आहात मी केले. अजून त्याला बरच काही शिकायचे आहे, अशी टीका खा. चिखलीकर यांचे नाव न घेता केली.

हेही वाचा -पंतप्रधान चुकीचं बोलले.. भारताने जगाला बुद्ध दिला पण उपयोगाचा नाही - संभाजी भिडे

केवळ विरोधी पक्षाच्याच कार्यकर्त्यांवर का कारवाई केली जात आहे. एक तरी भाजपा-शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर कार्यवाही केली नाही असा सवाल त्यांनी प्रश्न उपस्थित केला. देश हातातून गेला आता तरी राज्य तरी जाऊ देऊ नका. असे आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केले. यावेळी माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे, आ. अमिता चव्हाण, आ. वजाहत मिर्झा, आ.अमर राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details