महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अनैतिक संबंधास अडथळा.. नांदेडमध्ये पत्नीने घोटला पतीचा गळा - Nanded crime news

नांदेडमध्ये अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नीने गळा घोटून आणि जाळून ठार मारल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे.

wife-murdered-husband-immoral-relations-relations-in-nanded
नांदेडमध्ये अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नीने केली हत्या

By

Published : Feb 21, 2020, 4:22 PM IST

नांदेड -अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने गळा घोटून व जाळून ठार मारल्याची घटना शहरातील शिवबानगर भागात घडली. शहरातील शिवबानगर भागात रहात असलेल्या यल्लप्पा लक्ष्मण देगलूरकर (वय 30) यांना त्याच्या पत्नीने रात्री झोपीच्या गोळ्या दिल्या. यानंतर त्यांचा गळा आवळून खून केला. मात्र, त्यांनी स्वत:च जाळून घेतले असे भासवण्यासाठी घरातील सर्व जुने कपडे घेऊन त्यांना पेटवून दिले.

नांदेडमध्ये अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नीने केली हत्या

पतीची हत्या करून सकाळी पत्नीच्या काकाकडे जात पती माझ्याशी भांडत असून तो स्वत: जळून घेत मरणार असल्याची धमकी देत असल्याचे सांगितले. त्यानंतर मृताच्या काकांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता, यल्लाप्पा हे 70 टक्के भाजले होते. त्यांना तत्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, त्यांना मृत्त घोषित करण्यात आले. पंचनाम्या दरम्यान देगलूर पोलिसांना संशय आल्याने तपासाची चक्रे जलद गतीने फिरवण्यात आली.

मृताचे वडील लक्ष्मण गंगाराम देगलूरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी महिलेवर कलम 302, 101 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. तत्काळ आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. हा खुन अनैतिक संबंधातून झाला आहे. या खून प्रकरणात अजून कोणाचा हात आहे का? याचा तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details