नांदेड - बिलोली तालुक्यातील खतगाव शिवारात जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे पोलिसांनी तपासात उघडकीस आणले आहे.
यापूर्वी पत्नीनेच गायब झाल्याची केली होती तक्रार
खानापूर येथील एका महिलेने आपला पती गायब असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तक्रारदार महिलेची अधिक चौकशी केली असता तिनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे उघड झाल आहे.