महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मालमत्ता करात सामान्य जनतेला माफी का नाही? -डॉ.रविंद्र चौधरी - Nandurbar Municipal Corporation

भाजपा नगरसेवकांनी सहा महिन्याची घरपट्टी माफीची मागणी केली नसल्याचा खुलासा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला होता. या खुलाश्यावर भाजपाचे नेते डॉ.रविंद्र चौधरी यांनी पत्रकार परिषदेत घेत प्रत्युत्तर दिले आहे.

BJP leader Dr. Ravindra Chaudhary
भाजपा नेते डॉ.रविंद्र चौधरी

By

Published : Oct 27, 2020, 10:56 AM IST

नंदुरबार- नंदुरबार पालिकेच्या मालमत्तांना करोडो रुपयांची करमाफी केली असतांना सामान्य जनतेला सहा महिन्याची घरपट्टी का माफ होवू शकत नाही? असा सवाल भाजपाचे नेते डॉ.रविंद्र चौधरी यांनी उपस्थित केला आहे. कोरोनाच्या काळात सामान्य जनता आर्थिक संकटाने होरपळत आहे. नंदुरबार पालिकेने महिन्याभरात घरपट्टी माफीबाबत योग्य निर्णय घ्यावा. अन्यथा भाजपा जनआंदोलन करेल, असा इशारा डॉ.चौधरी यांनी दिला आहे.

भाजपा नेते डॉ.रविंद्र चौधरी

भाजपा नगरसेवकांनी सहा महिन्याची घरपट्टी माफीची मागणी केली नसल्याचा खुलासा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला होता. या खुलाश्यावर भाजपाचे नेते डॉ.रविंद्र चौधरी यांनी पत्रकार परिषदेत घेत प्रत्युत्तर दिले आहे. हिरा एक्झिकेटीव्ह येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, पालिकेचे प्रतोद चारुदत्त कळवणकर, नगरसेवक आनंदा माळी, गौरव चौधरी, आकाश चौधरी, प्रशांत चौधरी, संगिता सोनवणे, कमल ठाकुर, संतोष वसईकर, लक्ष्मण माळी उपस्थित होते.

चंद्रकांत रघुवंशी यांचे घुमजाव

यावेळी प्रा.डॉ.रविंद्र चौधरी म्हणाले की, भाजपा नगरसेवकांनी नंदुरबार शहरात सहा महिन्याची घरपट्टी माफ करावी, अशी मागणी केली असतांना घरपट्टी माफी झाल्यानंतर याचे श्रेय भाजपा नगरसेवकांनी जाईल व सत्ताधारी जनतेसमोर खजिल होतील. या भितीनेच चंद्रकांत रघुवंशी यांनी घुमजाव करीत सहा महिने घरपट्टी माफीचा ठराव नसल्याचे सांगत केवळ करात दहा टक्के सवलत देण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले.

...तर भाजपा जनआंदोलन करणार

दरम्यान, कोरोना काळात जनता होरपळत असतांना मालमत्ता करमाफीचे अधिकार पालिकेला नसल्याचे चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले होते. त्यावर रविंद्र चौधरी यांनी प्रत्युत्तर दिले, पालिका मालकीच्या असलेल्या सी.बी.गार्डन, नाट्यमंदिर, वॉटरपार्क, इंदिरा मंगल कार्यालय या मालमत्तांची करोडो रूपयांचा मालमत्ता कर माफ केला. मग सामान्य जनतेला करमाफी का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नंदुरबार पालिकेची मालमत्ता असलेले छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर एका संस्थेला चालविण्यासाठी दिले आहे. सदर संस्थेच्या करारनाम्यात वीजबिल व मालमत्ता कर संबंधित संस्थाचालकाने भरावयाचे नमुद करण्यात आले आहे. असे असतांना सुद्धा पालिकेने लाखो रुपयांचे मालमत्ता कर माफ तरी कसा केला? असे सांगत येत्या महिन्याभरात घरपट्टी माफीबाबत योग्य निर्णय न झाल्यास भाजपा जनआंदोलन करणार असल्याचा इशारा डॉ.चौधरी यांनी दिला.

सत्ताधार्‍यांकडून दडपशाही

भाजपा नगरसेवक नागरिकांच्या समस्येवर आवाज उठवित असतांना नगरसेवकांना अपात्र करण्याची धमकी माजी आमदार रघुवंशी यांनी दिली आहे. जनहितासाठी भाजपा नगरसेवक पालिकेच्या सभेत मुद्दे मांडत असतांना सत्ताधार्‍यांकडून त्यांच्यावर दडपशाही करत असल्याचा आरोप डॉ.रविंद्र चौधरी यांनी केला. विशेष म्हणजे सहा महिन्याच्या घरपट्टी माफीची मागणी केली नसल्याचा आरोप माजी रघुवंशी यांनी करित सर्वसाधारण सभेचे दुसरेच व्हिडीओ दाखविल्याचे चौधरी यांनी सांगितले. कारण पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी तांत्रिक अडचणींमुळे सभेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग झाले नसल्याचा खुलासा केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details