नांदेड - हिमायतनगर नगरपालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. सॅनिटायझरऐवजी पाण्याची फवारणी करताना नगर पालिकेचे कर्मचारी आढळून आले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सॅनिटायझरऐवजी पाण्याची फवारणी; नागरिकांनी काम पाडले बंद - नांदेड कोरोना अपडेट्स
सॅनिटायझरऐवजी पाण्याची फवारणी करताना नगर पालिकेचे कर्मचारी आढळून आले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सॅनिटायझरऐवजी पाण्याची फवारणी; नागरिकांनी फवारणीचे काम पाडले बंद
नगरपालिकेचे कर्मचारी फवारणी करत असताना नागरिकांनी ही फवारणी तत्काळ बंद पाडून फवारणी सॅम्पलचे नमुने बाटलीमध्ये घेऊन लॅबमध्ये पाठविले आहेत. आता या नमुन्यांची तपासणी झाल्यावरच खरे काय ते समोर येणार आहे. सध्या तरी हिमायतनगर शहरात नागरिकांनी फवारणी थांबवून तपासणी अहवालाची वाट पाहत आहेत.