नांदेड- जिल्ह्यात पाणीटंचाईचे मोठे संकट 'आ'वासून उभे असताना आता दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे. जिल्ह्यातील नांदुसा येथे टँकरद्वारे आळ्या मिश्रीत दुषित पाणी पुरवठा होत असल्याचा प्रकार समोर आला असून ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. यावर प्रशासन मार्ग काढणे दूरच उलट प्रशासनातील गटविकास अधिकारी हा पाणी पुरवठा बंद करण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे नागरिकांनी तातडीने शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे.
नांदेडमध्ये पाणीटंचाईनंतर आता टँकरद्वारे दूषित पाणीपुरवठा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
जिल्ह्यातील नांदुसा येथे पाणी पातळी प्रचंड खालावली असून परिसरातील सर्व पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. त्यामुळे पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. जिल्ह्यातील नांदुसा येथे पाणी पातळी प्रचंड खालावली असून परिसरातील सर्व पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. त्यामुळे पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून गेल्या काही दिवसांपासून दुषित पाणी पुरवठा होत असल्याने सध्या पुरवठा केलेले पाणी नागरिकांच्या जिवाला हानिकारक आहे.
हा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आणून दिला आणि नांदुसा येथे टँकरद्वारे आळ्या मिश्रीत दुषित पाणी पुरवठा होत असल्याचा प्रकार समोर आला असला तरी गटविकास अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांचीच बाजू घेत ग्रामस्थांना पाणी पुरवठा बंद करण्याची धमकी दिल्यामुळे संतप्त नागरिकांनी गटविकास अधिकारी यांना धारेवर धरले. दरम्यान लवकरात लवकर शुध्द पाणीपुरवठा करा अन्यथा पाणी पुरवठा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.