महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडकरांची तहान भागवणारा विष्णुपुरी प्रकल्प कोरडाठाक; पाण्यासाठी नागरिकांची भटकंती - Nanded

नांदेड शहराला विष्णूपुरी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. चालू वर्षी ३० दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले होते़. दिग्रस बंधाऱ्यातूनही नांदेडला पाणी घेण्यात आले होते. मात्र, पाण्याचे योग्य नियोजन न केल्याने आणि विष्णूपुरी प्रकल्पातून अवैधरित्या होणारा पाणीउपसा रोखण्यात प्रशासनाला अपयश आल्याने, मे महिन्यातच नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली होती.

नांदेडकरांची तहान भागवणारा विष्णुपुरी प्रकल्प कोरडाठाक; पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

By

Published : Jun 11, 2019, 11:22 AM IST

नांदेड -नांदेडकरांची तहान भागवणारा विष्णूपुरी प्रकल्प ३० मेपासूनच कोरडा झाल्याने पाण्यासाठी शहरवासियांची भटकंती सुरू आहे़. शहरातील अनेक भागांत तब्बल १० ते १२ दिवसांपासून पाणी आलेले नाही त्याचवेळी शहरात अपुऱ्या टँकरने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

नांदेडकरांची तहान भागवणारा विष्णुपुरी प्रकल्प कोरडाठाक; पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

नांदेड शहराला विष्णूपुरी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. चालू वर्षी ३० दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले होते़. दिग्रस बंधाऱ्यातूनही नांदेडला पाणी घेण्यात आले होते. मात्र, पाण्याचे योग्य नियोजन न केल्याने आणि विष्णूपुरी प्रकल्पातून अवैधरित्या होणारा पाणीउपसा रोखण्यात प्रशासनाला अपयश आल्याने, मे महिन्यातच नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली होती. विष्णूपुरी प्रकल्पातील मृत जलसाठ्यातून नांदेडकरांची तहान ३१ जुलैपर्यंत भागेल असे महापालिकेने म्हटले होते़. मात्र, प्रत्यक्षात मृतजलसाठाही अत्यल्प असून कसेबसे पंप सुरू आहेत. आता प्रशासकीय स्तरावर ऐनवेळी सिद्धेश्वर धरणातून पाणी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

प्रत्यक्षात सिद्धेश्वर धरणातही मृत जलसाठाच शिल्लक आहे़. त्यामुळे या प्रकल्पातून पाणी घेणार किती आणि त्यातले किती पाणी विष्णूपुरीपर्यंत पोहचेल हाही एक प्रश्नच आहे़. तब्बल १२० किमी अंतर कापून हे पाणी विष्णूपुरीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे पाणी आल्यानंतरच शहरवासियांची तहान भागणार आहे़. शहरात पाण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडालेली असताना महापालिकेचे पदाधिकारी मात्र कुठेही पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पुढे आल्याचे अद्याप तरी दिसलेले नाहीत.

ABOUT THE AUTHOR

...view details