महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कल्याणकारी योजनांचा लाभ द्या; नांदेडमध्ये दिव्यांगांचा आत्मदहनाचा इशारा - nanded marathi news

कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा या मागणीसाठी दिव्यांग बांधवांनी आंदोलन पुकारले आहे.

दिव्यांग बांधवांचे आंदोलन
दिव्यांग बांधवांचे आंदोलन

By

Published : Dec 29, 2020, 3:56 PM IST

नांदेड - कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा या मागणीसाठी दिव्यांग बांधवांनी आंदोलन पुकारले आहे. मागण्या मान्य कराव्यात अन्यथा महापालिकेसमोर सरण रचून आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. दिव्यांगाना कल्याणकारी योजनेतून मिळणारे घरकुल, व्यवसायासाठी २०० चौ.मी गाळे मिळावेत, आणि महापालिकेचा दिव्यांग अनुशेष भरण्यात यावा, या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

दिव्यांग बांधवांचे आंदोलन
दिव्यांग सुधारित कायदा २०१६ ची अंमलबजावणी करावी-केंद्र आणि राज्य शासनाने बेरोजगार दिव्यांगांच्या कल्याण व पुनर्वसनासाठी विविध कल्याणकारी योजना अमलात आणल्या आहेत. मात्र स्थानिक प्रशासनाकड़ून दिव्यांगाना कुठल्याच योजनेचा लाभ मिळत नाही. घरकुलाची मागणी देखील मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. रोजगार नसल्याने दिव्यांगाना घर भाडं भरने अवघड झाले आहे. तेव्हा महापालिकेने घरकुलाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, अशी मागणी नेहमी केली जाते. मात्र अद्याप या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही.

आत्मदहनाचा इशारा-

दिव्यांगाना न्याय मिळावा, या मागणीसाठी अनेकवेळा आंदोलन केले आहे. मात्र प्रशासनाला जाग आली नाही. दिव्यांगाना कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा अन्यथा महापालिकेसमोर सरण रचुन आत्मदहन करण्याचा इशारा उपोषणकर्त्यानी दिला आहे.

हेही वाचा-चिंताजनक..! नव्या कोरोना विषाणूचे सहा रुग्ण भारतात सापडले

ABOUT THE AUTHOR

...view details