नांदेड- जिल्ह्यात नुकतीच अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या पुराच्या तडाख्यात खरीपाचे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यातून सावरत असतानाच हवामान विभागाने दि. ९ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत पुन्हा पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे खरीपातील हातातोंडाशी आलेली पिके जातात की काय, या धास्तीने शेतकरी काळजीत पडले आहेत.
नांदेड जिल्ह्यात ९ ते १५ ऑक्टोबर दरम्यान पावसाचा इशारा; शेतकरी पुन्हा काळजीत! - हवामान विभागाचा अंदाज
दि. ९ ते दि. १४ ऑक्टोबर या कालावधीत परतीच्या पावसाची दाट शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. याबाबत हवामान विभागाने जिल्हा प्रशासन तसेच कृषी विभागाला सूचना दिली आहे.
![नांदेड जिल्ह्यात ९ ते १५ ऑक्टोबर दरम्यान पावसाचा इशारा; शेतकरी पुन्हा काळजीत! warning-of-rain](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9095042-971-9095042-1602139879489.jpg)
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अनेक विभागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे नदी, ओढे, नाल्यांना आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, ज्वारी आदी पिकांचे नुकसान झाले होते. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक पाहणीत जिल्ह्यात तब्बल ८३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत . पुन्हा पावसाचा इशारा दिल्यामुळे शेतकऱ्यांचे आवसान गळाले आहे.
दि. ९ ते दि. १४ ऑक्टोबर या कालावधीत परतीच्या पावसाची दाट शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. याबाबत हवामान विभागाने जिल्हा प्रशासन तसेच कृषी विभागाला सूचना दिली आहे. यामुळे कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी शेतकऱ्यांना पिकांचे पावसापासून संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.