नांदेड - घराघरात पारंपारिक गुढीसोबतच कोरोनाविरूद्ध लढण्याच्या ठाम संकल्पाची गुढी उभारण्याची गरज आहे. ही लढाई केवळ सरकारची लढाई नाही, तर ही प्रत्येक व्यक्तीची लढाई आहे. या लढाईत सरकारला नागरिकांकडून फक्त सर्व शासकीय निर्देशांच्या काटेकोर अंमलबजावणीची अपेक्षा आहे. असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.
कोरोना विरुद्ध लढण्याची गुढी उभारू - अशोक चव्हाण - गुढी उभारत गुढीपाडवा सण साजरा
कोरोना विषाणूविरोधातील लढाईत सरकारला नागरिकांकडून फक्त सर्व शासकीय निर्देशांच्या काटेकोर अंमलबजावणीची अपेक्षा आहे. असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
अशोक चव्हाण
नांदेड येथील आनंद निलयम या निवासस्थानी चव्हाण कुटुंबीयांनी गुढी उभारत गुढीपाडवा सण साजरा केला. यावेळी अशोक चव्हाण यांनी शासनाने व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा. कोरोनाला हरविण्यासाठी जनतेने घरीच राहण्याचे आवाहन केले. तसेच कोरोना विरुद्धची लढाई आपण जिंकू, असा विश्वास चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.