नांदेड - अवैध रेती उत्खननाच्या अनुषंगाने देण्यात आलेले उपोषणाचे निवेदन मागे घेण्यासाठी ५० हजार रुपयाची खंडणी मागितली. त्या नंतर पुन्हा १ लाख रुपये घेताना रंगेहात पकडलेल्या ६ खंडणी बहाद्दरांविरुद्ध वजिराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये ५ पत्रकारांसह एका मनसेच्या तालुकाध्यक्षांचा समावेश असून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
एक लाखाची खंडणी घेताना मनसे तालुकाध्यक्षासह पत्रकारांना पडकले रंगेहाथ
माहूरचे तहसीलदार सिध्देश्वर वरणगावकर यांना किनवटचा मनसे तालुकाध्यक्ष तथा पत्रकार नितीन मोहरे, माहूरचा मनसे तालुकाध्यक्ष गजानन कुलकर्णी, दुर्गादास राठोड , अंकुश भालेराव, कामारकर व राजकुमार स्वामी यांनी अवैधरेती उत्खननाच्या अनुषंगाने उपोषणास बसण्याचे निवेदन दिले होते. हे निवेदन मागे घेण्यासाठी व खोट्या बातम्या वर्तमान पत्रात प्रकाशित करुन व बातम्या पुन्हा प्रकाशित न करण्यासाठी पुर्वी ५० हजार रुपये खंडणी घेतली होती.
माहूरचे तहसीलदार सिध्देश्वर वरणगावकर यांना किनवटचा मनसे तालुकाध्यक्ष तथा पत्रकार नितीन मोहरे, माहूरचा मनसे तालुकाध्यक्ष गजानन कुलकर्णी, दुर्गादास राठोड , अंकुश भालेराव, कामारकर व राजकुमार स्वामी यांनी अवैधरेती उत्खननाच्या अनुषंगाने उपोषणास बसण्याचे निवेदन दिले होते. हे निवेदन मागे घेण्यासाठी व खोट्या बातम्या वर्तमान पत्रात प्रकाशित करुन व बातम्या पुन्हा प्रकाशित न करण्यासाठी पुर्वी ५० हजार रुपये खंडणी घेतली होती. त्यानंतर उर्वरीत १ लाख रुपये खंडणी स्वीकारताना २० ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात रंगेहाथ पकडले. याप्रकरणी तहसीलदार सिध्देश्वर वरणगावकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पाच खंडणीबहाद्दरांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून अन्य एकजण फरार आहे.