महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Deglur By Election LIVE : देगलूर विधानसभेत सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६०.९२ टक्के मतदान; वाचा अपडेट्स एका क्लिकवर

Voting underway for bye-elections Nanded Deglur Biloli
Deglur By Election LIVE : देगलूर विधानसभेत सकाळी 9 वाजेपर्यंत 6 टक्के मतदान; वाचा अपडेट्स एका क्लिकवर

By

Published : Oct 30, 2021, 10:34 AM IST

Updated : Oct 30, 2021, 6:55 PM IST

18:54 October 30

सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६०.९२ टक्के मतदान

देगलूर पोटनिवडणूकीसाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६०.९२ टक्के मतदान झाले आहे. आज सकाळी ७.०० ते सायंकाळी ५.०० या दरम्यान ९४२२७ पुरुष मतदार तर ८७५२३ स्त्री मतदार असे एकूण १लाख ८१ हजार ७५० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

15:24 October 30

देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीत दुपारी 03 वाजेपर्यंत 48 . 57 टक्के मतदान झाले आहे.

देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीत दुपारी 03 वाजेपर्यंत 48 . 57 टक्के मतदान झाले आहे.

14:13 October 30

देगलूर विधानसभा मतदारसंघात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 1 वाजेपर्यंत 31.40 टक्के मतदान झाले.

12:25 October 30

देगलूर विधानसभेत 12 वाजेपर्यंत 21.22 टक्के मतदान झाले आहे.

11:09 October 30

देगलूर विधानसभेत सकाळी 10 वाजेपर्यंत 12 टक्के मतदान झाले आहे.

11:09 October 30

देगलूर विधानसभेत सकाळी 9 वाजेपर्यंत 6 टक्के मतदान

एकूण 412 मतदान केंद्रावर मतदान पार पडतयं.

09:58 October 30

Deglur By Election LIVE : देगलूर विधानसभेत 1 वाजेपर्यंत 31.40 टक्के मतदान; वाचा अपडेट्स एका क्लिकवर

नांदेड -संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणूकीसाठी आज सकाळी सात वाजता मतदान सुरू झाले. या मतदारसंघात भाजपा (BJP) महाविकास आघाडी, (Mahavikas Aghadi) वंचितच्या उमेदवारात चुरस निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील देगलूर पोटनिवडणूक ही प्रतिष्ठेची लढत असून भाजपाने सुभाष साबणे आणि काँग्रेसने जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली आहे. सुभाष साबणे यांनी शिवसेनेला रामराम ठोकून भाजपामध्ये प्रवेश केला होता. सुभाष साबणे शिवसेनेत नाराज होते. साबणे हे भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत. 

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. काँग्रेसकडून रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. एकूण 12 उमेदवार मैदानात आहेत. या निवडणुकीसाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या निवडणूकीत 412 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रीयेत 1 लाख 54 हजार 92 पुरुष मतदार, तर 1 लाख 44 हजार 256 स्त्री मतदार व इतर 5 आणि शासकीय अधिकारी व कर्मचारी मतदाराची संख्या 187 असून असे एकूण 2 लाख 98 हजार 540 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान मतदान असल्यामुळे या भागात सर्व कार्यालयाना सुट्टी देण्यात आली आहे. 

या पोटनिवडणुकीत पंढरपूरची पुनरावृत्ती व्हावी यासाठी भाजपाने आपला पूर्ण जोर लावला होता. प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, केंद्रीयमंत्री भागवत खुबा, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले अशा मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या. तर काँग्रेसचा गड म्हणणाऱ्या महाविकास आघाडीकडून विजय वडेट्टीवार, मंत्री अशोक चव्हाण, नाना पटोले, धनंजय मुंडे, नीलम गोऱ्हे यांच्या सभांच्या तोफा धडकल्या होत्या. आरक्षित असणाऱ्या या मतदारसंघ पोट निवडणुकीत प्रमुख लढत ही काँग्रेस, भाजपा व वंचित आघाडी अशी तिहेरी आहे.

हेही वाचा -देशात 30 विधानसभा आणि 3 लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु; 2 नोव्हेंबरला निकाल

Last Updated : Oct 30, 2021, 6:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details