महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...आणि रेशन दुकानाच्या परवान्यासाठी बिलोली तालुक्यात झाले मतदान

स्वस्त धान्य दुकानदाराच्या मनमानीबाबत तहसीलदाराकडे गावकऱ्यांनी तक्रार दिली होती. सततच्या तक्रारीनंतर तहसीलदाराने बिलोली तालुक्यातील बेळकोणी गावात जाऊन रेशन दुकानाच्या परवान्यासाठी मतदान घेतले.

By

Published : Feb 8, 2020, 1:28 PM IST

गावकरी
गावकरी

नांदेड- बिलोली तालुक्यातील बेळकोणी येथील स्वस्त धान्य दुकानदार सय्यद हनिफ हसन पटले हे रेशनच्या धान्य वाटपात मनमानी कारभार करत ग्राहकांची लूट करत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली. या तक्रारीची दखल घेत बिलोलीचे तहसीलदार यांनी बेळकोणी गावात जाऊन रेशन दुकानाचा परवाना कोणाला द्यावा, यासाठी मतदान घेतले.

रेशन दुकानाच्या परवान्यासाठी झाले मतदान

बेळकोनी गावातील स्वस्त धान्य दुकानदार यांच्याविरुद्ध गावकऱ्यांच्या नेहमीच्या तक्रारीची दखल घेत शनिवार (दि. 8 फेब्रुवारी) त्यांनी बेळकोनी गावाला भेट देत रेशन दुकानाचा परवाना योग्य माणसाच्या हाती जावा यासाठी गावकऱ्यांच्या मदतीने मतदान घेतले आहे.

हेही वाचा - नांदेडच्या आठवडे बाजारात अतिक्रमण कारवाई विरोधात शेतकरी, विक्रेत्यांचा गोंधळ; भाजीपाला फेकला रस्त्यावर

रेशनधारकांना रेशन कमी देत, प्रत्येक कुटुंबाला चार ते पाच किलो रेशन कमी देत पावती देत नसल्याचा प्रकार घडत असल्याने तहसीलदार बेळकोनी गावात जाऊन कारवाई करत रेशन दुकान योग्य माणसाच्या हातात देण्यात यावा यासाठी संपूर्ण गावकऱ्यांचे मतदान घेतले आहे. या प्रक्रियेवेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अखेर गावकऱ्यांचे मतदान घेऊन मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली आहे. यासाठी बिलोलीचे तहसीलदार उत्तम निलावर, रामतीर्थ पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आर. एस. घाडगे व पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत.

हेही वाचा - नांदेडमध्ये पुन्हा एकदा अशोक चव्हाणांचे वर्चस्व; पोटनिवडणुकीत सहा पैकी पाच जागेवर काँग्रेसचे वर्चस्व

ABOUT THE AUTHOR

...view details