महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विष्णुपुरी प्रकल्पाचा पाणीसाठा वाचविण्यासाठी महापालिकेची धावपळ...! - river

नांदेड शहराचा पाणी पुरवठा विष्णुपुरी जलाशयावर अवलंबून आहे. ऑगस्टमध्ये तुडुंब भरलेल्या प्रकल्पातून वेगाने पाणीसाठी कमी होत गेला. त्यामुळे नोव्हेंबरपासूनच महापालिकेला एक दिवसा ऐवजी दोन दिवसाआड पाणी पुरवठा द्यावा लागला.

विष्णुपुरी प्रकल्प

By

Published : Apr 30, 2019, 8:18 AM IST

नांदेड- विष्णुपुरी जलाशयातील अत्यल्प पाणीसाठा वाचविण्यासाठी महापालिकेसह दक्षता पथकाची धावपळ सुरू झाली आहे. रविवारपासून जलाशयाच्या दोन्ही बाजूने पथकांनी गस्त घालणे सुरू केले असून, या परीसरातील दहा गावांमधील कृषिपंपाचा वीज पुरवठा महावितरण कंपनीने तोडला आहे. त्यामुळे पाण्याच्या अवैध उपशावर नियंत्रण येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विष्णुपुरी प्रकल्प आणि नांदडे महापालिका

नांदेड शहराचा पाणी पुरवठा विष्णुपुरी जलाशयावर अवलंबून आहे. ऑगस्टमध्ये तुडुंब भरलेल्या प्रकल्पातून वेगाने पाणीसाठी कमी होत गेला. त्यामुळे नोव्हेंबरपासूनच महापालिकेला एक दिवसा ऐवजी दोन दिवसाआड पाणी पुरवठा द्यावा लागला. त्यातच रब्बी पिकांसाठी या प्रकल्पातून दोन पाणी पाळ्या सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱयांना पाणी उपसा करण्याची मुभा मिळाली, जलाशयाच्या तिरावरील विद्युतपंप काढण्यास स्थानिक आमदाराने विरोध केल्यामुळे या विषयात राजकारण शिरले आणि जलाशयातील साठा अधिकच कमी होत गेला.

जलाशयात सध्या आठ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. अवैध उपशामुळे पूर्वी अर्धा दलघमी पाणी दररोज कमी होत होते. ते प्रमाण सध्या ०. ३४ दलघमीपर्यंत आले आहे. पथकाने गस्त सुरू केल्यानंतर अवैध उपशावर मोठे नियंत्रण मिळण्याची चिन्हे आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details