नांदेड- ओबीसी नेते त्यांच्या समाजाची बाजू लावून धरत आहेत. मात्र, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण मात्र एक शब्द बोलत नाहीत. मग आरक्षण उपसमितीचे अध्यक्षपददेखील अशोक चव्हाण यांनी सोडले पाहिजे, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे. नोकर भरती 31 मार्चपर्यंत स्थगित करण्याची मागणीदेखील त्यांनी केली. ते नांदेडमधील एल्गार मेळाव्यात मेटे बोलत होते.
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण हायकोर्टात टिकले नाही, असा आरोप विनायक मेटे यांनी केला. 31 मार्चपर्यंत नोकर भरती पुढे ढकलण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षण उपसमितीचा राजीनामा द्यावा हेही वाचा-संसदेत महाराष्ट्र : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?
अन्यथा मोठा सामाजिक कलह निर्माण होईल-
एल्गार मेळावा घेण्याची वेळच यायला नाही पाहिजे. ते तुमच्या हातात होते. मराठा आरक्षण टिकले पाहिजे, ही मागणी शिव संग्राम संघटनेची नाही, तर मराठा समाजाची आहे. ही गरज मराठा समाजाची आहे. तशीच महाराष्ट्राची घडी आहे, तशीच ठेवण्यासाठीदेखील महत्त्वाची आहे. अन्यथा मोठा मोठा सामाजिक कलह झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मेटे यांनी दिला.
हेही वाचा-'आजचे साधू नालायक आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका' विजय वडेट्टीवार यांचे वादग्रस्त वक्तव्य
अशोक चव्हाण का बोलत नाहीत?
ओबीसी आरक्षणावर छगन बुजबळ आणि विजय वडेट्टीवार हे नेहमी उलट-सुलट बोलताना दिसत आहेत. ओबीसी समाजाची बाजू त्यांनी लावून धरली आहे. मात्र मराठा समाजाचा एकही आमदार आणि मंत्री मराठा आरक्षणावर बोलत नाही. आरक्षणावर स्थगिती, नोकर भरती, स्पर्धा परीक्षा या कोणत्याही विषयावर अशोक चव्हाण बोलत नाहीत. मग, आरक्षण उपसमिती पदावर का बसले आहात, असा सवाल मेटे यांनी उपस्थित केला.
हेही वाचा-डोक्याला मार लागून पूजा चव्हाणचा मृत्यू झाल्याचा शवविच्छेदन अहवालामध्ये उल्लेख
अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा-
पुढे विनायक मेटे म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात अनेकवेळा अशोक चव्हाण यांच्याशी भेट घेतली. पत्रव्यवहार केला. त्याच्या पीएशी बोललो. मात्र त्यांनी ऐकले नाही. त्यांच्या मनातच खोट आहे, त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही. मराठा समाजाच्या मुलांचे भले करायचे नाही, हा चव्हाण यांचा अजेंडा आहे, अशी टीका विनायक मेटे यांनी केली.