महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड : चिथावणीखोर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल - Video viral against administration nanded

गुरुद्वारा लंगर साहिब परिसर आणि अबचलनगर भागात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. प्रशासनाने हा भाग कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित केला आणि नागरिकांना प्रवेश प्रतिबंध केला आहे.

Police station vajirabad, nanded
पोलीस ठाणे वजिराबाद, नांदेड

By

Published : Jun 7, 2020, 4:16 PM IST

नांदेड -प्रशासनाच्या विरोधात चिथावणीखोर व्हिडिओ क्लिप सोशल मिडियावर टाकल्या प्रकरणी एका तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स. रणजितसिंघ गिल (रा.गुरुद्वारा परिसर) असे आरोपीचे नाव आहे. वजिराबाद पोलीसांनी ही कारवाई केली.

गुरुद्वारा लंगर साहिब परिसर आणि अबचलनगर भागात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. प्रशासनाने हा भाग कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित केला आणि नागरिकांना प्रवेश प्रतिबंध केला आहे. कोरोनाचा फैलाव वाढू नये, यासाठी प्रशासनाच्या सूचनेवरून गुरुद्वारा बोर्ड प्रशासनाने यात्रीनिवासमधील बुकींग बंद केली आहे.

दरम्यान, यात्रेकरूंना रोखणारे तुम्ही कोण?, असा प्रश्न करीत स. रणजितसिंघ गिल (रा.गुरुद्वारा परिसर) या तरुणाने पोलीस व प्रशासनाच्या विरोधात चिथावणीखोर व्हिडिओ क्लिप तयार केली. तसेच ती सोशल मिडियावर प्रसारीत केली. या व्हिडिओ क्लिपमध्ये जनतेनी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले.

या प्रकरणी पोलीस शिपाई माधव मरीकंटेलू यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलीस ठाण्यात रणजितसिंघ गिल याच्याविरोधात कलम विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details