महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुरू नानक देव यांची शिकवण जगाला मार्ग दाखवणारी - कुलगुरु डॉ. भोसले - nanded news

गुरू नानक देवजी यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त स्वामी रामनंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व पंजाबी विद्यापीठ पटियाला यांच्या संयुक्त विद्यमाने नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. भोसले यांनी शीख धर्म हा जनकल्याणाचा संदेश देणारा धर्म आहे.

गुरू नानक देव यांची शिकवण जगाला मार्ग दाखवणारी- कुलगुरु डॉ. भोसले

By

Published : Aug 25, 2019, 9:58 AM IST

नांदेड - गुरू नानक देव यांचे विचार व शिकवण मानव धर्म शिकवणारी आहे. त्यांनी त्यांच्या शकवणीतून जगाला मार्ग दाखवला आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केले.

गुरू नानक देवजी यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त स्वामी रामनंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व पंजाबी विद्यापीठ पटीयाला यांच्या संयुक्त विद्यमाने नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर पटियाला विद्यापीठाचे गुरमितसिंग सिद्धू , अभीनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पांडे, सचिव क.म जोशी, गुरुद्वारा बोर्डाचे परमज्योत सिंग चाहेल, लड्डूसिंग महाजन, प्रा सुधीर शिवणीकर, डॉ दीपक शिंदे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. वैजयता पाटील, डॉ. दीपक बचेवार, डॉ. महेश मगर यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना कुलगुरू डॉ भोसले यांनी शीख धर्म हा जनकल्याणाचा संदेश देणारा धर्म आहे. त्याचे कारण या धर्माला दूरदृष्टी असणारे गुरू नानक देव यांच्या सारखे महान धर्म संस्थापक लाभले. पंजाबी विद्यापीठ व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांनी मिळून हे चर्चा सत्र आयोजित करून नवा पायंडा निर्माण केल्याचे ते म्हणाले.

या वेळी बाळासाहेब पांडे, न्या चाहेल, गुरतसिंग सिद्धू, कृ.म. जोशी, प्रा. सुधीर शिवणीकर आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक रवींद्र मोदी यांनी, तर आभार डॉ. दीपक शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. परविंदर कौर महाजन यांनी केले. कार्यक्रमास पंजाबी विद्यापीठातील २८ संशोधक, रणजित सिंग चिरागिया, माजी प्राचार्य हारमहेंद्र सिंग, रणजित सिंग कामठेकर, डॉ. मनीष देशपांडे, डॉ. नंदकुमार साखरकर, डॉ. निरंजन कौर, नौनिहाल सिंग जहागीरदार, यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ABOUT THE AUTHOR

...view details